१. गाडी संख्या ०७६११ नांदेड-मुंबई राज्यराणी विशेष गाडी दिनांक ३ डिसेंबर २०२० रोजी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री २२.०० वाजता परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी १०.०७ वाजता पोहोचेल.
२. गाडी संख्या ०७६१२ मुंबई-नांदेड राज्यराणी विशेष गाडी दिनांक ४ डिसेंबर २०२० रोजी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरून सायंकाळी १८.४५ वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी, मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे सकाळी ०७.२० वाजता पोहोचेल.
या गाडीस १७ डब्बे असतील.
३. गाडी संख्या ०७०५८ सिकंदराबाद-नांदेड-मुंबई देवगिरी विशेष गाडी दिनांक ५ डिसेंबर २०२० रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी १३.२५ वाजता सुटून नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी ०७.१० वाजता पोहोचेल.
४. गाडी संख्या ०७०५७ मुंबई-नांदेड-सिकंदराबाद देवगिरी विशेष गाडी दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी सीएसटी मुंबई रेल्वे स्थानकावरून रात्री २१.३० वाजता सुटून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे सिकंदराबाद येथे दुपारी १४.४० वाजता पोहोचेल.
या गाडीस २१ डब्बे असतील.
दोन्ही गाड्या पूर्ण आरक्षित आहेत. या विशेष गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहेत.
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.
No comments:
Post a Comment