नांदेडात घडला चोरीचा अजब प्रकार.
किरायाने दिलेल्या दुकानात मालकानेच केली चोरी....
नांदेड.
नांदेड शहरात असणाऱ्या श्रीनगर भागात एक अजब प्रकार घडला ज्या दुकान मालकाने त्याचे दुकान एका इमिटेशन ज्वेलरी च्या दुकानदाराला दुकान भाड्याने दिले पण त्याचा दुकानातील जवळ पास साडे आठ लाख रुपये किंमतीची साहित्य चोरीचा गुन्हा भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सविस्तर हकीकत पुढील प्रमाणे नांदेड शहरातील अती गजबजलेल्या भागा पैकी एक भाग म्हणजे श्रीनगर या भागातील मुख्य रोडवर असणाऱ्या न्यू बँग्ल रोल गोल्ड बेंटकेस दागिने चे दुकान आहे मागच्या २० वर्षा पासून शेख नसीरुद्दीन शेख आबु ताहेर हे दुकान चालवतात रोजच्या प्रमाणे ते रात्री दुकान बंद करून आपल्या घरी गेले होते.पण या दुकानाचे दुकान मालक शाहू कुल्थे, प्रवीण शहाणे यांनी संगनमत करून दुकान फोडले आणि त्यातील ७ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे बेंटेक्स चे दागिने नगदी एक लाख रुपये आणि फर्निचर असा ८ लाख ४६ हजार रुपये किंमती चा ऐवज लंपास केल्याची तक्रार तसेच किरायदार शेख नसीरुद्दीन यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार भाग्य नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास पो. नि.अभिमन्यु साळुखे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment