भामट्याने लावला पोलिसाला चुना
![]() |
३५लाखाच्या गृह कर्जाच्या मंजुरी साठी लाटले २.६९हजार
नांदेड:
नांदेड पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी श्री.बालाजी क्षीरगिरे ह्यांनी नांदेड च्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की एका व्यक्तीने त्यांना महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतून ३५ लाखाचे गृह कर्ज काढून देतो अशी हमी देत जानेवारी २०२० ते जून २०२० या कालावधीत ऐकून २ लाख ६९ हजार रुपये घेतले आणि काम करतो म्हणाला पण पेशे देऊन काम होत नाही या कारणावरून ती व्यक्ती आपली फवणूक करत आहे असे निदर्शनं आले पण दरम्यान त्या व्यक्तीने त्यांना त्यांच्या २लाख ६९ हजार मधील १लाख ६०हजार रुपये हे काम होत नाही म्हणून त्यांचा बँक खात्यात जमा केले आणि १लाख ९ हजार रुपये परत केले नाही म्हणून बालाजी क्षिरगिरे यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पालम येथील भामट्या विरूध्द तक्रार दाखल केली. तरी एका पोलीस कर्मचारी फसवणुकीचा गुन्ह्याचा अधिक तपास भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोळुके करीत आहेत .
No comments:
Post a Comment