Search This Blog

Sunday, 1 November 2020

बंदुकीचा धाक दाखवून मुदखेड सोने चांदी व्यापाऱ्याला लुटीचा प्रयत्न


नांदेड.
दि.1.

नांदेड जिल्ह्यातील आणि नांदेड पासून जवळच असणाऱ्या मुदखेड तालुक्यात नांदेड शहरातजसे बंदुकीचा धाक दाखवून लुटले जात आहे तसेच लोण ग्रामीण भागात पोहचेल आहे.

मुदखेड भागात व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण

नांदेड शहरात बड्या व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार घडले आहेत आणि काही लोकांन वर गोळी बार ही करण्यात आल्याचा घटना घडत असताना आता काही असामाजिक तत्वांनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे मुदखेड भागात दिनांक 31 च्या रात्री घडली या सोन्याचे व्यापारी यांना मागील काही दिवसांपासून टार्गेट करून लुटीच्या घटना घडत आहेत त्या घटनेच्या प्रकार नुसारच ही पण घटना आहे का हे पोलिसांनी तपासून पहावे लागणार आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

दि.३१ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास ३ दरोडेखोर दुचाकीवरून  मोढा परिसरात शिरले होते व त्यांनी प्रसाद ज्वेलर्सचे मालक  पवितवार दुकान बंद करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आणि पैशांची बॅग सोबत घेऊन दुकानाबाहेर आले असता त्या दरोडेखोरांनी विपिन पवितवार या सराफास बंदुक दाखवून त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याच्या प्रयत्न केला.

त्याना खंजीर आणि बंदूक दाखवत मारहाण केली  दरोडेखोरांनी मोटरसायकलसोडून पळ काढला शेजारचे दुकानदार आल्याने सोने व्यापाऱ्याला लुटण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.

मुदखेड शहरात बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत झालेल्या झटापटीत व्यापारी पाबितवार यांना दरोडेखोरांनी मारहाण केल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुदखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र,ते गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.सुरेश भाले, पोलीस कर्मचारी ठाकुर,पांचाळ,शिंदे,कानकुले,शेख, लोहाळे, यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.पोलिसांनी घटनास्थळाहून बंदुकीची मॅगझिन जप्त केली आहे.पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासत दरोडेखोरांचा माग काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे.

या प्रकारच्या घटना घडू नये त्या बाबत पोलिसांनी तपास लवकर करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या पाहिजे.



No comments:

Post a Comment