शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळाला पाहिजे ; खासदार हेमंत पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
हिंगोली: विमा कंपनीच्या जाचक अटी आणि इंटरनेट सुविधेच्या अभावी हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली,नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नसेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा यंदाच्या खरीप हंगामातील पिकाचा पीकविमा महसूल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून सरसकट मिळाला पाहिजे अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठीकत केली.
कोरोना आणि परतीच्या पावसामुळे झालेली अतिवृष्टी यामुळे राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झालेला असताना राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे वीज आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांना वेळेअभावी आणि विमा कंपनीच्या जाचक अटी, 72 तासात ऑनलाईन माहिती भरणे तसेच , वेब साईट बंद केल्यामुळे, पीकविमा भरता आला नाही.त्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे.त्यामुळे यंदाच्या हंगामात पीकविमा भरलेल्या आणि न भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट खरिपाचा पीकविमा मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे . हा पीकविमा महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर मंजूर करून वाटप करण्यात यावा असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले . राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी योजना आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्याबाबत बैठक आयोजित केली होती.या बैठकीला खासदार हेमंत पाटील यांची उपस्थिती होती.बैठकीत राज्यातील शेतीविषयक अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली.
No comments:
Post a Comment