Search This Blog

Sunday, 6 December 2020

मायेची ऊब उपक्रम अंतर्गत निराधारांना सहाशे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

मायेची ऊब उपक्रम अंतर्गत निराधारांना सहाशे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
नांदेड: 
कडाक्‍याची थंडी पडत असल्यामुळे रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या निराधारांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे " मायेचा ऊब " या उपक्रमांतर्गत  पहिल्या रात्री  सहा तासात तब्बल सहाशे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले नगीना घाट येथे
नांदेड भूषण संतबाबा  
बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते "मायेची ऊब" च्या वाहनाची पूजा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम  उपप्रांतपाल  लॉ. दिलीप मोदी हे होते. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, गॅट एरिया लीडर लॉ. जयेश ठक्कर, झोन चेअरमन लॉ. योगेश जैस्वाल आणि लॉ. विजय भारतीया,  जीएसटी कॉर्डिनेटर लॉ.गौरव भारतीया, नांदेड लॉयन्सचे अध्यक्ष
लॉ. दीपक रंगगानी, लॉयन्स सफायरचे लॉ. रविंद्र औंढेकर, सेंट्रल चे सेक्रेटरी लॉ. ॲड. उमेश मेगदे , भाजयुमो माजी अध्यक्ष दिलीपसिंघ सोडी, भाजप उपाध्यक्ष परमवीरसिंघ मल्होत्रा यांच्या हस्ते थंडीत कुडकुडत झोपलेल्या निराधारांना ब्लॅंकेट पांघरण्यात आले . लॉयन्स सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल यांनी गोविंद उत्तरवार,रितेश तेहरा यांच्यासह सर्व ब्लॅंकेट दात्यांचा सिरोपाव आणि मोत्याची माळ टाकून सन्मान केला.बाबाजींच्या हस्ते सर्व माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, एकदा रात्री दीड वाजता घरी परत येत असताना थंडीत गोरठलेल्या वेडसर इसमाला  पाहून सत्कारात मिळालेली शाल  त्याच्या अंगावर पांघरली. पण तरीदेखील त्याचे कुडकुडणे सुरू असल्यामुळे ब्लॅंकेट देण्याचे ठरवले. प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर यांच्या  कल्पकतेचे तोंडभरून कौतुक केले. दिलीप मोदी, जयेश ठक्कर, सीए गौरव भारतीया यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. रात्री साडेनऊ वाजता नगीना घाट येथून सुरुवात करून  जुना मोंढा, शनी मंदिर, गणपती मंदिर, बंदा घाट, हनुमान पेठ, गांधी पुतळा, शिवाजी पुतळा, कोर्ट परिसर तसेच रेल्वे स्टेशनवर उघड्यावर झोपलेल्या निराधारांना  ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम सकाळी  साडेतीन वाजेपर्यंत चालला .शहरातील राजेशसिंह ठाकूर, कैलास महाराज वैष्णव, राहुल तेलंग, दिगंबर रुमणे,आवेस बेग ,संतोष भारती यांनी परिश्रम घेतले. नूतन वर्ष 2021 असल्यामुळे संकल्पपूर्तीसाठी  आणखी 800 बँकेची आवश्यकता असल्यामुळे नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे.

ज्ञानसागरास विनम्र अभिवादन.....

            🙏डॉ. बाबासाहेब आंबेडकर.🙏
                   🙏 महापरिनिर्वाण🙏
           गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते बे आचार्य अत्रे. 
       अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा'तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. 
     त्यातील हा 7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख ......

      डॉ.आंबेडकर हे स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होते - आचार्य अत्रे

बाबा गेले सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. 
     भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. 
    शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. 
       दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला.  
       जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. 
        सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला.
          पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला,    
        त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.

         आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. 
         आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. 
     आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली 'भीमा'ची गदा होय. 
    आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय.
             आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय.  
        आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय.

      महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. 
   पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदुमुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. 
          बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते.

        जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच 'लोकसभे' त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, 'हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.' 
       हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. 
           जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना 'अस्पृश्य' मानणारी ती तुमची 'मनुस्मृति'मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते.

       यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. 
     तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! 
    आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.

               धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ''हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. 
        पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !'' 
       हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. 
          अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असे.      
    पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता.

       अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. 
     तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. 
     आणि पुणे 'करारा' वर सही केली.     
  गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते.
    'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.  

  आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि,''स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!''
      नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले.
      आंबेडकर म्हणाले, 'जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!' आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. 
  काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि 'स्वातंत्र भारता'ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. 
      'मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!'
                घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही.

      आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, 
     तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.  

          डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? 
     वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता.

   शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. 
      आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.
    धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते.
        त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता.
      म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा 'साऱ्या भारताला मी बौध्द करीन!' अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. 
     पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते.
         अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता. भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. 
   आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. 
      आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दा लागली नाही.
  'मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!'
    ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते.

     आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.
   आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. 
     भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. 
     आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान् प्रणेते होते.  

     महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. 
     बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! 
   आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वता त्यांचा त्याग, चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपापल्या जीवनांत निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहीलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उध्दार होईल. 
       तीन कोटि मराठी जनतेच्या वतीनं व्याकूळ हृदयाने आणि अश्रपूर्ण नेत्रानीं आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो .

लेखं - आचार्य अत्रे.
(मराठा : 7-12-1956)
सर्व वाचकांसाठी सविनय सादर .

Saturday, 5 December 2020

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळाला पाहिजे खासदार हेमंत पाटील यांचे कृषी मंत्र्याकडे मागणी.

शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळाला पाहिजे ; खासदार हेमंत पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

हिंगोली: विमा कंपनीच्या जाचक अटी आणि  इंटरनेट सुविधेच्या अभावी हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली,नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील   ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नसेल त्या  शेतकऱ्यांना सुद्धा यंदाच्या खरीप हंगामातील पिकाचा पीकविमा महसूल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून सरसकट मिळाला पाहिजे अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री  दादाजी भुसे यांच्यासोबत झालेल्या  बैठीकत केली.
             कोरोना आणि  परतीच्या पावसामुळे झालेली अतिवृष्टी यामुळे राज्यातील  शेतकरी पुरता हवालदिल झालेला असताना राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे वीज आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे  अनेक भागातील शेतकऱ्यांना वेळेअभावी आणि विमा कंपनीच्या जाचक अटी, 72 तासात ऑनलाईन माहिती भरणे तसेच , वेब साईट बंद केल्यामुळे,  पीकविमा भरता आला नाही.त्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे.त्यामुळे यंदाच्या हंगामात पीकविमा भरलेल्या आणि न भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट खरिपाचा पीकविमा मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी   खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे . हा पीकविमा महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर मंजूर करून वाटप करण्यात यावा असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले . राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी योजना आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्याबाबत बैठक आयोजित केली होती.या बैठकीला खासदार हेमंत पाटील यांची  उपस्थिती होती.बैठकीत राज्यातील शेतीविषयक अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली.

Monday, 30 November 2020

राज्यराणी एक्स्प्रेस दिनांक ३ डिसेंबर पासून तर देवगिरी एक्स्प्रेस ५ डिसेंबर पासून धावणार.

 राज्यराणी एक्स्प्रेस दिनांक ३ डिसेंबर पासून तर देवगिरी एक्स्प्रेस ५ डिसेंबर पासून धावणार.

. गाडी संख्या ०७६११ नांदेड-मुंबई राज्यराणी विशेष गाडी दिनांक ३ डिसेंबर २०२० रोजी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री २२.०० वाजता परभणी, जालना,  औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी १०.०७ वाजता पोहोचेल.  

२. गाडी संख्या ०७६१२ मुंबई-नांदेड राज्यराणी विशेष गाडी दिनांक ४ डिसेंबर २०२० रोजी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरून सायंकाळी १८.४५  वाजता सुटून  मनमाड, औरंगाबाद, जालना,  परभणी, मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे सकाळी ०७.२० वाजता पोहोचेल.  
या गाडीस १७ डब्बे असतील.  

३. गाडी संख्या ०७०५८ सिकंदराबाद-नांदेड-मुंबई देवगिरी  विशेष गाडी दिनांक ५ डिसेंबर २०२० रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी १३.२५ वाजता सुटून नांदेड, परभणी, जालना,  औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी ०७.१० वाजता पोहोचेल.  

४. गाडी संख्या ०७०५७ मुंबई-नांदेड-सिकंदराबाद देवगिरी विशेष गाडी दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी सीएसटी मुंबई रेल्वे स्थानकावरून रात्री २१.३० वाजता सुटून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे सिकंदराबाद  येथे दुपारी १४.४० वाजता पोहोचेल. 
 या गाडीस २१ डब्बे असतील.  

 दोन्ही गाड्या पूर्ण आरक्षित आहेत. या विशेष  गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहेत.

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.

Tuesday, 17 November 2020

लॉयन्सचा डबा उपक्रमातून साजरी अनोखी दिवाळी.

लॉयन्सचा डबा उपक्रमातून साजरी अनोखी दिवाळी.



नांदेड:

घरातील व्यक्ती आजारी असल्यामुळे दिवाळी साजरी न करू शकणारे  रुग्णांचे नातेवाईक तसेच रस्त्यावरील निराधारांना दिवाळीचा फराळ देऊन आणि दिवाळीचे चार दिवस दररोज मिष्टान्न भोजन  असलेला लॉयन्सचा डबा वाटप करून लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलने  अभिनव पद्धतीने दिवाळी साजरी केली.

रयत रुग्णालय व श्री गुरुजी रुग्णालय येथे गेल्या दोन वर्षापासून
लॉयन्सचा डबा हा उपक्रम सुरू आहे. श्री गुरुजी  रुग्णालयात तर आगामी दोन वर्षाची आगाऊ नोंदणी अन्नदात्यांनी केली आहे. कोलकता येथील प्रमोदसिंह यांच्यावतीने रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच रस्त्यावरील निराधारांना दिवाळीचा फराळ धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर अर्णवसिंह राजपूत, नरेंद्र पटवारी, मन्मथ स्वामी राजेशसिंह ठाकूर यांनी वाटप केला.सणांचा राजा असलेल्या दिवाळीचे चार दिवस दररोज वेगवेगळे मिष्ठान्न लॉयन्सच्या डब्यात देण्यात आले. पहिल्या दिवशी पूर्वा शोभित जैस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच डॉ. व्ही. एम. सहस्त्रबुद्धे यांच्यातर्फे पुरणपोळी देण्यात आली.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व दिलीप ठाकूर यांच्यातर्फे बेसन चक्की डब्यात देण्यात आली.बुंदीचे लाडू सह जेवण तिसऱ्या दिवशी कै. सुभानजी संभाजी गंगासागरे उमरी यांच्या स्मरणार्थ तसेच मामोडे परिवारातील पूर्वजांच्या स्मरणार्थ नंदलाल गोकुळजी मामोडे यांच्यातर्फे  वाटप करण्यात आले.भाऊबीज व पाडव्याचे औचित्य साधून कै. सत्यनारायणजी भारतीया तसेच कै. चंद्रभानलाल जयकिशनलाल अग्रवाल तामसा यांच्या स्मरणार्थ शिरा पुरी व मसाला भात डब्यात देण्यात येणार आहे. रयत रुग्णालयात तिसऱ्या वर्षासाठी एक जानेवारी पासून नवीन नोंदणी करण्यात येत आहे. लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने  मायेची ऊब हा  रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या निराधारांना ब्लॅंकेट वाटपाचा नवीन उपक्रम  सुरू करण्यात आला असून दानशूर नागरिकांनी  याही उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन लॉयन्स प्रथम उपप्रांतपाल लॉ. दिलीप मोदी,अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, झोनल चेअरमन लॉ. डॉ. विजय भारतीया व लॉ.योगेश जैस्वाल,सचिव लॉ. ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू,
व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण लॉ. ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

(छायाः व्यंकटेश वाकोडीकर)

Friday, 13 November 2020

नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिल्या नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा.


 

नवीन नांदेड बाजार पेठ दिवाळीच्या निमत्ताने गेली गजबजून


 नवीन नांदेड  बाजार पेठ दिवाळीच्या निमत्ताने गेली गजबजून.

नवीन नांदेड:
हिंदू सणाचा राजा म्हणजे दिवाळी आणि दिवाळी हा सण समाजातील श्रीमत् गरीब हा मोठ्या उत्साहात साजरी करीत असतो पण यंदाची ही 2020 ची दिवाळी ही करोणा संकटा मुळे थोडी झाकोळली आहे मागील 4/5 महिण्यान पासून बाजारात जी गर्दी गायब होती ती सण उत्सवाच्या काळात वाढते ही बाब लक्षात ठेऊन शासनाने या वर्षी च्या सर्वच सणा वा रात नियम नियमावली तयार करून दिली .
करोना काळात सर्व सामान्य जनतेने काळजी घेणे आवश्यक आहे पण दिवाळी सणाच्या निमित्ताने लोक ही मोठ्या प्रमाणत खरेदी साठी बाजार पेठेत गर्दी करत आहेत आणि शासन नियमांचा विसर पडल्याचे चित्र जवळ पास सर्वच भागात दिसत आहे .
नांदेड जिल्ह्यातील करोना रुग्ण संख्या ही जरी कमी होत असली तरी आपण आपली काळजी घेणे महत्त्वाचे आहे.



Thursday, 12 November 2020

मुंबई-किनवट - मुंबई विशेष रेल्वे चा विस्तार आदिलाबाद पर्यंत.

मुंबई-किनवट - मुंबई विशेष रेल्वे चा विस्तार आदिलाबाद पर्यंत.


प्रवाशांच्या सुविधे करिता मुंबई-किनवट -मुंबई विशेष रेल्वे दिनांक 12 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. 

या विशेष रेल्वे चा विस्तार आदिलाबाद पर्यंत करण्यात आला आहे. हि रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे.  अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील --

१.  गाडी संख्या ०११४१  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मुंबई ते आदिलाबाद  - हि गाडी दिनांक १३ नोवेंबर  २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रोज सायंकाळी १६. ३५ वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद,  नांदेड, किनवट मार्गे आदिलाबाद  येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता पोहोचेल.

२. गाडी संख्या ०११४२ हुजूर साहेब नांदेड ते  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -- हि गाडी दिनांक १४ नोवेंबर २०२० पासून आदिलाबाद रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी १३.०० वाजता सुटेल आणि किनवट, हुजूर साहेब नांदेड, औरंगाबाद-मनमाड मार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५. ३५ वाजता पोहोचेल.

हि गाडी दोन्ही दिशेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा , हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्रकुंड, बोधडी बुज्रुग, किनवट  येथे थांबेल.

या गाडीस एकूण १८ डब्बे असतील. या गाडीत वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि  आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल.

हि विशेष गाडी नियमित रेल्वे गाडी सुरु होई पर्यंतच असेल.

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल. 

Wednesday, 11 November 2020

नांदेडात घडला चोरीचा अजब प्रकार.


नांदेडात घडला चोरीचा अजब प्रकार.


किरायाने दिलेल्या दुकानात मालकानेच केली चोरी....

नांदेड.

नांदेड शहरात असणाऱ्या श्रीनगर  भागात एक अजब प्रकार घडला ज्या दुकान मालकाने त्याचे दुकान एका इमिटेशन ज्वेलरी च्या दुकानदाराला दुकान भाड्याने दिले पण त्याचा दुकानातील जवळ पास साडे आठ लाख रुपये किंमतीची साहित्य चोरीचा गुन्हा भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सविस्तर हकीकत पुढील प्रमाणे नांदेड शहरातील अती गजबजलेल्या भागा पैकी एक भाग म्हणजे श्रीनगर या भागातील मुख्य रोडवर असणाऱ्या न्यू बँग्ल रोल गोल्ड बेंटकेस दागिने चे दुकान आहे मागच्या २० वर्षा पासून शेख नसीरुद्दीन शेख आबु ताहेर हे दुकान चालवतात रोजच्या प्रमाणे ते रात्री दुकान बंद करून आपल्या घरी गेले होते.पण या दुकानाचे दुकान मालक शाहू कुल्थे, प्रवीण शहाणे यांनी संगनमत करून दुकान फोडले आणि त्यातील ७ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे बेंटेक्स चे दागिने नगदी एक लाख रुपये आणि फर्निचर असा ८ लाख ४६ हजार रुपये किंमती चा ऐवज लंपास केल्याची तक्रार तसेच किरायदार शेख नसीरुद्दीन यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार भाग्य नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास पो. नि.अभिमन्यु साळुखे हे करीत आहेत.

Friday, 6 November 2020

भामट्याने लावला पोलिसाला चुना...

भामट्याने लावला पोलिसाला चुना



 ५लाखाच्या गृह कर्जाच्या मंजुरी साठी लाटले २.६९हजार 


नांदेड: 

नांदेड पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी श्री.बालाजी क्षीरगिरे ह्यांनी नांदेड च्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की एका व्यक्तीने त्यांना महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतून ३५ लाखाचे गृह कर्ज काढून देतो अशी हमी देत जानेवारी २०२० ते जून २०२० या कालावधीत ऐकून २ लाख ६९ हजार रुपये घेतले आणि काम करतो म्हणाला पण पेशे देऊन काम होत नाही या कारणावरून ती व्यक्ती आपली फवणूक करत आहे असे निदर्शनं आले पण दरम्यान त्या व्यक्तीने त्यांना त्यांच्या २लाख ६९ हजार मधील १लाख ६०हजार रुपये हे काम होत नाही म्हणून त्यांचा बँक खात्यात जमा केले आणि १लाख ९ हजार रुपये परत केले नाही  म्हणून  बालाजी क्षिरगिरे यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पालम  येथील भामट्या विरूध्द तक्रार दाखल केली. तरी एका पोलीस कर्मचारी फसवणुकीचा गुन्ह्याचा अधिक  तपास भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोळुके करीत आहेत .

Tuesday, 3 November 2020

उत्सवी रेल्वे सेवांचा लाभ घ्या ...उपिंदर सिंघ

उत्सवी रेल्वे सेवांचा लाभ घ्या ...उपिंदर सिंघ 

उत्सव काळात नांदेड रेल्वे विभागाच्या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांचे आवाहन......

नांदेड

दि.03

कोविड काळात नियमित रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधे करिता नांदेड रेल्वे विभाग 11 रेल्वे गाड्या चालवीत आहे, यात 3 विशेष गाड्या तर 8 उत्सव विशेष गाड्यांचा समावेश आहे. देशाच्या विविध  भागात प्रवास करता यावा या करिता या गाड्या उपयोगी पडत आहेत. या विशेष गाड्यांमुळे नांदेड विभागातून प्रवाशांना  मुंबई, पनवेल, पुणे, दिल्ली, आग्रा, अमृतसर,सिकंदराबाद, पटना, तिरुपती, अमरावती, जयपूर, अजमेर, भिलवाडा, इटारसी, जबलपूर,  इत्यादी ठिकाणी प्रवास करणे शक्य होत आहे.  
या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशां करिता काही बर्थ / सिट शिल्लक आहेत. या रेल्वे गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी केले आहे. 

या विशेष गाड्या पुढील प्रमाणे आहेत – 


1. गाडी संख्या 12765  तिरुपती ते अमरावती (द्वी-साप्ताहीक) : दर मंगळवार आणि शनिवारी तिरुपती येथून दुपारी 15.10 वाजता सुटत आहे.  काचीगुडा, नांदेड मार्गे अमरावती येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 14.50 वाजता पोहोचत आहे. . हि गाडी  दिनांक 20.10.2020 ते 28.11.2020 दरम्यान धावेल – या गाडी मध्ये जवळपास 50% जागा शिल्लक आहेत. 
2. गाडी संख्या 12766 अमरावती ते तिरुपती (द्वी-साप्ताहिक) : दर गुरुवार आणि सोमवारी अमरावती येथून सकाळी 06.45  वाजता सुटत आहे.  अकोला, नांदेड, काचीगुडा मार्गे तिरुपती येथे सकाळी 06.40 वाजता पोहोचत आहे.   हि गाडी दिनांक 22.10.2020 ते 30.11.2020 दरम्यान धावेल. या गाडीतही जवळपास 50% जागा शिल्लक आहेत. 
3. गाडी संख्या 02720 हैदराबाद ते जयपूर (द्वी-साप्ताहीक) : दर मंगवारी आणि गुरुवारी हैदराबाद येथून रात्री 20.35 वाजता सुटत आहे  आणि नांदेड, अकोला, अजमेर मार्गे जयपूर येथे सकाळी 06.05 वाजता पोहोचत आहे. हि गाडी दिनांक दिनांक 21.10.2020 ते 25.11.2020 पर्यंत धावेल. या गाडीत जवळपास 20% जागा शिल्लक आहेत. 
4. गाडी संख्या 02719 हैदराबाद ते जयपूर (द्वी-साप्ताहीक) : दर गुरुवारी आणि शुक्रवारी जयपूर  येथून दुपारी 15.20 वाजता सुटून अजमेर, अकोला, नांदेड,  मार्गे हैदराबाद येथे 00.45 वाजता पोहोचत आहे. हि गाडी दिनांक दिनांक 23.10.2020 ते 27.11.2020 पर्यंत धावेल. या गाडीत जवळपास 20% जागा शिल्लक आहेत. 
5. गाडी संख्या 07610  पूर्णा ते पटना (साप्ताहीक) : दर शुक्रवारी  पूर्णा  येथून सायंकाळी 18.10  वाजता सुटून नांदेड, आदिलाबाद, नागपूर, इटारसी, जबलपूर, पंडित दीनदयाळ उपाध्याय जं., आरा  मार्गे पटना  येथे सकाळी 02.30 वाजता पोहोचत आहे. हि गाडी दिनांक दिनांक 23.10.2020 ते 27 .11.2020 पर्यंत धावेल. या गाडीत जवळपास 50 % जागा शिल्लक आहेत. 
6. गाडी संख्या 07609 पटना ते पूर्णा (साप्ताहिक) : दर   मंगळवारी पटना येथून रात्री 23.10 वाजता सुटून आरा, सतना, जबलपूर, इटारसी, नागपूर, आदिलाबाद मार्गे पटना येथे सकाळी 07.10 वाकता पोहोचत आहे. हि गाडी दिनांक 25.10.2020 ते 29.11.2020  दरम्यान धावेल. या गाडीस चांगला प्रतिसाद आहे. 
7. गाडी संख्या 07639 काचीगुडा ते अकोला (साप्ताहिक) : दर सोमवारी काचीगुडा येथून सकाळी 07.10 वाजता सुटून निझामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम मार्गे अकोला येथे सायंकाळी 18.30 वाजता पोहोचत आहे. हि गाडी दिनांक 26.10.2020 ते 23.11.2020 दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 80 % जागा शिल्लक आहेत. 
8. गाडी संख्या 07640 अकोला ते काचीगुडा (साप्ताहिक) : दर मंगळवारी अकोला येथून सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि वाशीम, हिंगोली, पूर्णा, अकोला, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद मार्ग काचीगुडा येथे रात्री 20.15 वाजता पोहोचेल. या गाडीत जवळपास 80 % जागा शिल्लक आहेत. हि गाडी दिनांक 27.10.2020 ते 24.11.2020 दरम्यान धावेल. 
9. गाडी संख्या 07641 काचीगुडा ते नारखेर () : हि गाडी   सोमवार वगळता रोज काचीगुडा येथून सकाळी 07.10 वाजता सुटून निझामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, मुर्तीजापूर, न्यू अमरावती मार्गे नारखेर येथे रात्री 23.10 वाजता पोहोचत आहे. हि गाडी दिनांक 23.10.2020 ते 29.11.2020 दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 60% जागा शिल्लक आहेत.  
10. गाडी संख्या 07642 नारखेर ते काचीगुडा  : हि गाडी  मंगळवार वगळता रोज नारखेर  येथून सकाळी 04.30 वाजता सुटून  आणि वाशीम, हिंगोली, पूर्णा, अकोला, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद मार्ग काचीगुडा येथे रात्री 20.15 वाजता पोहोचत आहे. हि गाडी दिनांक 24.10.2020 ते 30.11.2020 दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 60 % जागा शिल्लक आहेत. 
11. गाडी संख्या 07614 नांदेड ते पनवेल : हि गाडी रोज सायंकाळी 17.30 वाजता हु.सा. नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटून परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद, कुरुदुवादी, दौंड, पुणे मार्गे पनवेल येथे सकाळी 09.00 वाजता पोहोचत आहे. हि गाडी दिनांक 23.10.2020 ते 29.11.2020 दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 45% जागा शिल्लक आहेत. 
12. गाडी संख्या 07613 पनवेल ते नांदेड : हि गाडी रोज सायंकाळी 16.00 वाजता पनवेल येथून सुटून पुणे, दौंड, कुरुदुवादी, उसमानाबाद, परळी, परभणी मार्गे नांदेड येथे सकाळी 09.25 वाजत पोहोचत आहे हे . हि गाडी दिनांक 24.10.2020 ते 30.11.2020 दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 65% जागा शिल्लक आहेत. 
13. गाडी संख्या 07688 धर्माबाद ते मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस : हि गाडी रोज सकाळी 04.00 वाजता धर्माबाद येथून सुटत आहे, उमरी, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना, औरंगाबाद मार्गे मनमाड येथे दुपारी 13.20 वाजता पोहोचात आहे. हि गाडी दिनांक 24.10.2020 ते 30.11.2020 दरम्यान  धावेल.  या गाडीत जवळपास 70% जागा शिल्लक आहेत.  
14. गाडी संख्या 07687 मनमाड ते धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस : हि गाडी रोज दुपारी 15.00 वाजता मनमाड येथून सुटून नगरसोल , लासूर, रोटेगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे धर्माबाद ला 00.10 वाजता पोहोचते. हि गाडी दिनांक 24.10.2020 ते 30.11.2020 दरम्यान धावत आहे.या गाडीत जवळपास 70 % जागा शिल्लक आहेत.  
15. गाडी संख्या 07049 हैदराबाद ते औरंगाबाद : हि गाडी हैदराबाद येथून रोज रात्री 22.45 वाजता सुटत आहे, विकाराबाद, बिदर, उदगीर, लातूर रोड, परळी, परभणी, जालना मार्गे औरंगाबाद येथे दुपारी 13.20 वाजता पोहोचेल. हि गाडी दिनांक  23.10.2020 ते 29.11.2020 दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 45 % जागा शिल्लक आहेत. 
16. गाडी संख्या 07050  औरंगाबाद ते हैदराबाद : हि गाडी औरंगाबाद येथून रोज दुपारी 16.15 वाजता सुटून जालना, परतूर, सेलू, परभणी, परळी, उदगीर, विकाराबाद मार्गे हैदराबाद येथे सकाळी 06.30 वाजता पोहोचेल. दिनांक 24.10.2020 ते 30.11.2020 दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 30% जागा शिल्लक आहेत. 
17. गाडी संख्या 07564 परभणी ते हैदराबाद : हि गाडी परभणी येथून रोज रात्री २२.30 वाजता सुटत आहे, नांदेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद मार्गे हैदराबाद येथे सकाळी 06.45 वाजता पोहोचत आहे. हि गाडी दिनांक 12 सापतेम्बर पासून सुरु आहे. या गाडीत 25% जागा शिल्लक आहेत. 
18. गाडी संख्या 07563 हैदराबाद ते परभणी : हि गाडी हैदराबाद येथून रोज रात्री २२.45 वाजता सुटून निझामाबाद, बासर, नांदेड मार्गे परभणी येथे सकाळी 06.30 वाजता पोहोचत आहे. हि गाडी दिनांक 12 सप्टेंबर पासून सुरु आहे. या गाडीत जवळपास 30% जागा शिल्लक आहेत. 
19. गाडी संख्या 01141  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मुंबई ते किनवट मार्गे नांदेड  - हि गाडी दिनांक 12 ऑक्टोबर 2020 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रोज सायंकाळी 16.35 वाजतासुटून मनमाड, औरंगाबाद,  नांदेड मार्गे किनवट  येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 09.00 वाजता पोहोचत आहे. या गाडीस चांगला प्रतिसाद आहे.
20. गाडी संख्या 01142 किनवट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मार्गे नांदेड -- हि गाडी दिनांक 13 ओंक्टोबर 2020 पासून किनवट रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी 13.30 वाजता सुटून हुजूर साहेब नांदेड, औरंगाबाद-मनमाड मार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 05.35 वाजता पोहोचत आहे.  या गाडीस चांगला प्रतिसाद आहे. 
21. गाडी संख्या 02715 हु. सा. नांदेड ते अमृतसर – सचखंड एक्स्प्रेस:  दिनांक 1 जून पासून रोज सकाळी 09.30 वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटत आहे. परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, मार्गे अमृतसर येथे रात्री २२.25 वाजता पोहोचत आहे . या गाडीस चांगला प्रतिसाद आहे. 
22. गाडी संख्या 02716 अमृतसर ते हु. सा. नांदेड सचखंड एक्स्प्रेस:  हि गाडी दिनांक 3 जून 2020 पासून अमृतसर रेल्वे स्थानकावरून रोज सकाळी 05.30 वाजता सुटत आहे, दिल्ली, आग्रा, मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड  येथे सायंकाळी 16.00 वाजता पोहोचत आहे यागाडीस चांगला प्रतिसाद आहे. 


Sunday, 1 November 2020

बंदुकीचा धाक दाखवून मुदखेड सोने चांदी व्यापाऱ्याला लुटीचा प्रयत्न


नांदेड.
दि.1.

नांदेड जिल्ह्यातील आणि नांदेड पासून जवळच असणाऱ्या मुदखेड तालुक्यात नांदेड शहरातजसे बंदुकीचा धाक दाखवून लुटले जात आहे तसेच लोण ग्रामीण भागात पोहचेल आहे.

मुदखेड भागात व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण

नांदेड शहरात बड्या व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार घडले आहेत आणि काही लोकांन वर गोळी बार ही करण्यात आल्याचा घटना घडत असताना आता काही असामाजिक तत्वांनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे मुदखेड भागात दिनांक 31 च्या रात्री घडली या सोन्याचे व्यापारी यांना मागील काही दिवसांपासून टार्गेट करून लुटीच्या घटना घडत आहेत त्या घटनेच्या प्रकार नुसारच ही पण घटना आहे का हे पोलिसांनी तपासून पहावे लागणार आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

दि.३१ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास ३ दरोडेखोर दुचाकीवरून  मोढा परिसरात शिरले होते व त्यांनी प्रसाद ज्वेलर्सचे मालक  पवितवार दुकान बंद करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आणि पैशांची बॅग सोबत घेऊन दुकानाबाहेर आले असता त्या दरोडेखोरांनी विपिन पवितवार या सराफास बंदुक दाखवून त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याच्या प्रयत्न केला.

त्याना खंजीर आणि बंदूक दाखवत मारहाण केली  दरोडेखोरांनी मोटरसायकलसोडून पळ काढला शेजारचे दुकानदार आल्याने सोने व्यापाऱ्याला लुटण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.

मुदखेड शहरात बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत झालेल्या झटापटीत व्यापारी पाबितवार यांना दरोडेखोरांनी मारहाण केल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुदखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र,ते गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.सुरेश भाले, पोलीस कर्मचारी ठाकुर,पांचाळ,शिंदे,कानकुले,शेख, लोहाळे, यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.पोलिसांनी घटनास्थळाहून बंदुकीची मॅगझिन जप्त केली आहे.पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासत दरोडेखोरांचा माग काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे.

या प्रकारच्या घटना घडू नये त्या बाबत पोलिसांनी तपास लवकर करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या पाहिजे.



Saturday, 31 October 2020

Micromax ची In सिरीज ने होणार पुन्हा वापसी....

 Micromax ची Inसिरिज ने होणार पुन्हा वापसी....



मुंबई : भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्स (Micromax) 3 नोव्हेंबर रोजी त्यांच्या नव्या In-सिरीज या स्मार्टफोन्सद्वारे मार्केटमध्ये कमबॅक करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी सातत्याने या फोनबद्दल थोडी-थोडी माहिती शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी या नव्या इन-सिरीजमधील फिचर्सची माहिती समोर आली होती. आता या फोनचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

Micromax चे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी टेक्निकल गुरुजी Micromax ची In सिरीज ने होणार पुन्हा वापसी.... या युट्युबरला दिलेल्या मुलाखतीत In-सिरीजमधील स्मार्टफोनचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. राहुल यांनी यावेळी दोन स्मार्टफोन दाखवले. त्यातील एकाचा रंग पांढरा तर दुसरा स्मार्टफोन हिरव्या रंगाचा आहे. या नवीन स्मार्टफोन्सचे टीजर मायक्रोमॅक्स सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत आहे. सध्या अशा अफवा आहेत की, 3 नोव्हेंबर रोजी मायक्रोमॅक्स त्यांची In-सिरीज (Micromax In 1 आणि Micromax In 1A) लाँच करणार आहे. दरम्यान मुलाखतीदरम्यान राहुल शर्मा यांनी दोन्ही फोनच्या लाँचिंगची तारीख सांगितलेली नाही.

मेक in India

काही दिवसांपूर्वी राहुल शर्मा यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की, मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन हा आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग असेल. या इन-सिरीजचे सर्व स्मार्टफोन मेड इन इंडिया असतील.

मोबाईल फीचर्स.

मायक्रोमॅक्सच्या इन-सिरीजमध्ये दोन स्मार्टफोनचा (Micromax In 1 आणि Micromax In 1A) समावेश असेल. यापैकी पहिल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर असेल. या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 7 ते 15 हजार रुपयांपर्यंत असेल.

मिळालेल्या माहितीनुसार MediaTek Helio G35 प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन 2GB रॅम + 32GB स्टोरेज आणि 3GB रॅम + 32GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असेल.

दोन जीबी रॅम असलेल्या फोनमध्ये 13+2 मेगापिक्सल्सचा डुअल रियर कॅमरा सेटअप आणि 8 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. तर 3GB रॅम असलेल्या फोनमध्ये 13+5+2 मेगापिक्सल्सचा ट्रिपल रियर कॅमरा सेटअप असेल सोबत 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

Friday, 17 January 2020

12 हजाराजी मागणी करणारा पोलीस शिपाई निलंबित .

  • 12 हजाराजी मागणी करणारा पोलीस शिपाई निलंबित .


  • नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या  पोलीस शिपायाविरुध्द बारा हजार रुपयांची लाच मागणी करुन चार हजार रुपये मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. नामदेवढगे हे सध्या फरार झालेले होते.पण दिनांक 14रोजी अटक करून न्यायालयात उभे करण्यात आले तदनंतर नामदेव ढगे याला जामीन मिळाला.

12 जानेवारी रोजी एका गिट्टी क्रशर मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या कारखान्यावर उत्पादीत होणारी गिट्टी त्यांच्याकडे असलेल्या चार टिप्परमध्ये भरुन वाहतूक करत असतो आणि मागणीनुसार संबंधित व्यक्तीला दिली जाते. हे चार टिप्पर वाहतूक करण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नामदेव नागोराव ढगे हे प्रत्येक टिप्परचे तीन हजार असे बारा हजार रुपयांची मागणी करीत होते त्या प्रमाणे अशी तक्ररार दिली  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली तेंव्हा तडजोड होवून चार हजार रुपये स्विकारण्याची तयारी नामदेव नागोराव ढगे यांनी तयारी दाखविली. नामदेव ढगे ला शंका आल्याने त्यांनी काल दि.12 जानेवारी रोजी लाचेचे चार हजार रुपये स्विकारले नाहीत. आणि फरार झाले. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रुपयांची लाच मागणी केली अशा स्वरुपाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्याचा गुन्हा क्रमांक 26/2020 असा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सुधारीत 2018 नुसार कलम 7 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे हे करीत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस कर्मचारी हणमंत बोरकर, किशन चित्तोरे, गणेश केजकर, अमरजितसिंह चौधरी, विलास राठोड आणि मारोती सोनटक्के यांनी पार पाडली. तरी सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी/कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे. असे आव्हान केले आहे. दिनाक 14जाणे रोजी ढगे ला अटक करण्यात आली असून त्याची जामिनावर सुटका झाली आहे . तरी नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक श्री विजय कुमार मगर यांनी आदेश काढून पोलीस शिपाई नामदेव ढगे ला निलंबित केला आहे.