Search This Blog

Friday, 11 June 2021

चालण्याचा स्पर्धेचे आयोजन

चालण्याचा स्पर्धा 


भारतीय जनता पार्टी, लायन्स क्लब सेंट्रल आणी अमरनाथ यात्री संघ आयोजीत..

चालण्याचा स्पर्धेचे आयोजन दि 20 जुन सकाळी 6 वा आयोजीत करण्यात आल्या आहेत 

या मध्ये वय वर्ष 40 ते 60 आणी 

वय वर्ष 60 ते पुढे 

या स्पर्धेत महिला पुरूष दोघे ही सहभागी होऊ शकतील 

या मधील विजेता ना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत 

या स्पर्धेचे उद्घाटक खा प्रतापराव पाटील चिखलीकर 

असुन कार्यक्रम चे अध्यक्ष प्रवीण साले महानगराध्यक्ष भाजपा हे रहाणार आहेत 

प्रमुख उपस्थितीत मा दिलीपजी मोदी लायन्स चे प्रातंपाल हे उपस्थितीत रहाणार आहेत 

तरी जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग नोदवावा 

या स्पर्धा श्री राम सेतु गोवर्धन घाट जवळ होणार आहेत 

या संदर्भात काही माहीती हवी आसल्यास धर्मभूषण अॅड दिलीप ठाकूर यांचा शी संपर्क करावा

Tuesday, 8 June 2021

सुरेश आरगुलवार यांना पदोन्नती.

सुरेश आरगुलवार यांचा सत्कार करताना कार्यकर्ते 

नवीन नांदेड.दिनांक 8( गिरीधर मैड )

नविन नांदेड सिडको मातृ सेवा आरोग्य केंद्र येथील आरोग्य कर्मचारी सुरेश माधवराव आरगुलवार  यांची  नांदेड येथील जंगमवाडी दवाखान्यात आरोग्य साहयक या पदावार पदोन्नती झाली असून पदोन्नती मिळलया बद्दल मातृसेवा आरोग्य केंद्र कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
      ५ जुनं रोजी साहयक संचालक डॉ.ढगे यांनी दहा जणांची  आरोग्य साहयक म्हणून पदोन्नती केली त्यात सिडको मातृ सेवा आरोग्य केंद्र येथील आरोग्य कर्मचारी सुरेश आरगुलवार यांच्यी पदोन्नती वर बदली झाली.आरगुलवार हे 
१९९९ रोजी  मनपा सिडको येथे आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत होते,
 २१ वर्षाचा सेवे नंतर आरोग्य साहयक म्हणून पदोन्नती  मिळाल्या बद्दल सिडको मातृसेवा आरोग्य केंद्र वतीने दि.८ जुंन रोजी डॉ .अब्दुल हमीद,  व आरोग्य केंद्रातील कर्मचारी विवेकानंद लोखंडे,संदीप तुपेकर,भरत मुंडे, आकाश शिंगे ,परिचारीका जयश्री वाघमारे, मिनाक्षी शिंदे,नसरीन पिंजारी,जयश्री दरेगावे, वैशाली वाघमारे,पदमा कोतवाले,जयश्री लोखंडे यांनी सत्कार करून शुभच्छा दिल्या.
   साहयक संचालक डॉ.ढगे यांनी ५ जुनं रोजी काढलेलया आदेशानुसार दहा जणांची पदोन्नती केली आहे.
     सिडको येथे  कार्यरत  असतांना   आरगुलवार यांनी कुष्ठरोग,मलेरिया,हाथीरोग,पोलीओ, गोर रूबीला, माता बालसंगोपन या सह राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट काम करुन  कोरोणा लसिकरण  मध्ये पाझीटीवह रूग्नांना  सेवा देण्याचे काम केले. पदोन्नती मिळाल्या बदल मित्र मंडळ यांनीही अभिनंदन केले.