Search This Blog

Saturday, 31 October 2020

Micromax ची In सिरीज ने होणार पुन्हा वापसी....

 Micromax ची Inसिरिज ने होणार पुन्हा वापसी....



मुंबई : भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्स (Micromax) 3 नोव्हेंबर रोजी त्यांच्या नव्या In-सिरीज या स्मार्टफोन्सद्वारे मार्केटमध्ये कमबॅक करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी सातत्याने या फोनबद्दल थोडी-थोडी माहिती शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी या नव्या इन-सिरीजमधील फिचर्सची माहिती समोर आली होती. आता या फोनचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

Micromax चे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी टेक्निकल गुरुजी Micromax ची In सिरीज ने होणार पुन्हा वापसी.... या युट्युबरला दिलेल्या मुलाखतीत In-सिरीजमधील स्मार्टफोनचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. राहुल यांनी यावेळी दोन स्मार्टफोन दाखवले. त्यातील एकाचा रंग पांढरा तर दुसरा स्मार्टफोन हिरव्या रंगाचा आहे. या नवीन स्मार्टफोन्सचे टीजर मायक्रोमॅक्स सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत आहे. सध्या अशा अफवा आहेत की, 3 नोव्हेंबर रोजी मायक्रोमॅक्स त्यांची In-सिरीज (Micromax In 1 आणि Micromax In 1A) लाँच करणार आहे. दरम्यान मुलाखतीदरम्यान राहुल शर्मा यांनी दोन्ही फोनच्या लाँचिंगची तारीख सांगितलेली नाही.

मेक in India

काही दिवसांपूर्वी राहुल शर्मा यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की, मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन हा आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग असेल. या इन-सिरीजचे सर्व स्मार्टफोन मेड इन इंडिया असतील.

मोबाईल फीचर्स.

मायक्रोमॅक्सच्या इन-सिरीजमध्ये दोन स्मार्टफोनचा (Micromax In 1 आणि Micromax In 1A) समावेश असेल. यापैकी पहिल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर असेल. या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 7 ते 15 हजार रुपयांपर्यंत असेल.

मिळालेल्या माहितीनुसार MediaTek Helio G35 प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन 2GB रॅम + 32GB स्टोरेज आणि 3GB रॅम + 32GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असेल.

दोन जीबी रॅम असलेल्या फोनमध्ये 13+2 मेगापिक्सल्सचा डुअल रियर कॅमरा सेटअप आणि 8 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. तर 3GB रॅम असलेल्या फोनमध्ये 13+5+2 मेगापिक्सल्सचा ट्रिपल रियर कॅमरा सेटअप असेल सोबत 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.