- 12 हजाराजी मागणी करणारा पोलीस शिपाई निलंबित .
- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायाविरुध्द बारा हजार रुपयांची लाच मागणी करुन चार हजार रुपये मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. नामदेवढगे हे सध्या फरार झालेले होते.पण दिनांक 14रोजी अटक करून न्यायालयात उभे करण्यात आले तदनंतर नामदेव ढगे याला जामीन मिळाला.
12 जानेवारी रोजी एका गिट्टी क्रशर मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या कारखान्यावर उत्पादीत होणारी गिट्टी त्यांच्याकडे असलेल्या चार टिप्परमध्ये भरुन वाहतूक करत असतो आणि मागणीनुसार संबंधित व्यक्तीला दिली जाते. हे चार टिप्पर वाहतूक करण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नामदेव नागोराव ढगे हे प्रत्येक टिप्परचे तीन हजार असे बारा हजार रुपयांची मागणी करीत होते त्या प्रमाणे अशी तक्ररार दिली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली तेंव्हा तडजोड होवून चार हजार रुपये स्विकारण्याची तयारी नामदेव नागोराव ढगे यांनी तयारी दाखविली. नामदेव ढगे ला शंका आल्याने त्यांनी काल दि.12 जानेवारी रोजी लाचेचे चार हजार रुपये स्विकारले नाहीत. आणि फरार झाले. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रुपयांची लाच मागणी केली अशा स्वरुपाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्याचा गुन्हा क्रमांक 26/2020 असा आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सुधारीत 2018 नुसार कलम 7 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे हे करीत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस कर्मचारी हणमंत बोरकर, किशन चित्तोरे, गणेश केजकर, अमरजितसिंह चौधरी, विलास राठोड आणि मारोती सोनटक्के यांनी पार पाडली. तरी सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी/कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे. असे आव्हान केले आहे. दिनाक 14जाणे रोजी ढगे ला अटक करण्यात आली असून त्याची जामिनावर सुटका झाली आहे . तरी नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक श्री विजय कुमार मगर यांनी आदेश काढून पोलीस शिपाई नामदेव ढगे ला निलंबित केला आहे.