मयत : अशोक सुरवसे
तुरुंगातील मैत्री अशोक ला महागात पडली .....
प्रसाद न अशोक ची गठडीच वळली
!!!!
नांदेड:
नांदेड-लातूर महामार्गावर
येणाऱ्या कारेगाव शिवारात महामार्गा पासून २०० फुट अंतरावर एक 3०-३५ वर्षीय इसमाचे प्रेत असल्याची खबर कारेगाव चे
पोलीस पाटील यांनी लोहा पोलिसांना कळवली पोलिसयेण्या आधी महामार्गावरून जाणारे
येणारे बघ्यांची गर्दी जमली होती आणि hasssssssssहाsssssss म्हणता लोक त्याठिकाणी जमत होते त्या सोबत लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक त्या मध्ये
पो.नि.अशोक चाटे,स.पो.नि.धस,स.पो.नि पाटील पो.उप.नि.काथवटे पो.हे.कॉ.मारोती
सोनकांबळे,पोहेकॉ.गोनटे पो.कॉ.सोनटके,पो.कॉ.शरद आणि कर्मचारी हे कारेगाव शिवारात पोहाचले
असता एक शेता मध्ये एक ३०-३५ वर्षीय इसम
मृत अवस्तेत आढळून आला त्या प्रमाणे लोहा पोलिसांनी पंचनामा केला असता त्या
इसमाच्या शरीरावर आणि डोक्यात जबर घाव आढळून आले त्या घावा मुळे तो इसम मृत झाला
होता असे प्रथम दर्शनी वाटत होते पोलिसांनी आजुबाजू जमलेल्या लोकांना तो इसम
परिचित आहे का विचारले पण कोणीही माहिती देऊ शकले नाहीत त्या इसमाला कोणी तरी अज्ञात
व्यक्ती ने ठार केले होते आणि मयत हि अनोळखी होता पण पोलिसांनी मयत माणसाची झडती
घेतली असता पोलिसांना त्या च्या खिश्यात काही कागद पत्र मिळाल्यानुसार नुसार
त्याची ओळख पटणार होती पण या माणसाला कोणी आणि कशा साठी ठार मारेल हि बाब
अनुत्तरीत होती त्या मयत व्यक्तीचे नाव अशोक
वैजनाथ सुरवसे रा. सोनीमोहा ता. धारूर जि. बीड असे होते पोलिसांनी असे आढळून आले कि त्या इसमाचा खून होउन २४ तासाहून अधिक काळ
उलटले असावेत असे वाटत होते कारण हि घटना उघडकीस आली त्याच्या आदल्या दिवशी लोहा
परिसरात पाऊस झाला होता त्यामुळे त्या इसमाचे प्रेत कुजू लागले होते त्याचे डोळे
बाहेर पडले होते घटनास्थळी त्या इसमाचे रक्त पडले होते आणि शेजारी काही पडला होत
का घटनास्थळाची कसून आणि बारकाईने लोहा
पोलीस पथकाने पहाणी केली आणि या गुन्ह्या संबंधी काही धागे दोरे मिळतात का ते
तपासले पण घटनास्थालावरून अजून काही धागेदोरे मिळून आले नाही. पंचनामा सोपस्कार
आटपून लोहा पोलिसांनी सदरील प्रेत उत्तरीया तपासणीसाठी पाठून दिले आणि हा मयत अशोक
सुरवसे रा.सोनीमोहा ता.धारुर जि.बीड हा इतक्या लांब लोहा या ठिकाणी का आणि कशा
साठी आला होता हे पोलिसांना शोधायचे होते.
जुन महिना म्हणजे पावसाळा
सर्वत्र पावसाचे वातावरण आणि ढगांची गर्दी ह्या दिलखुलास आणि अल्हाद दाई वातावरण
असते उन्हाळ्याची गर्मी पासून मृग नक्षत्रात बरसणाऱ्या सरी मुळे वातवरण आणि मन
प्रसन्न होऊन जाते आणि त्या पावसाच्या सरींची आतुरतेने वाट पाहतो तो शेतकरी कारण
ह्या पावसाच्या आगमनावर शेतकऱ्याच जीवन अवलंबून असते ह्या सर्व बाबी ह्या जीवन
चक्रात आणि निसर्ग चक्रात घडणाऱ्या जस उन्हाळा येतो पावसाळा येतो त्या नंतर हिवाळा आणि मग या ऋत्र चक्रात मानव
जीवन हे चालत असते जस एखादा जीव जन्मतो तसाच तो निसर्ग नियमा प्रमाणे मारतो पण
काही च्या नशिबी अकाली मरण येते त्या प्रमाणेच मयत अशोक च्या बाबतीत झाला होत तो
बीड जिल्ह्याचा रहिवाशी आणि त्याचा मृतदेह हा नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील
कारेगाव शिवारात आणि तो हि कोणी तरी त्याचा धारधार शस्त्राने वार करून त्या चा खून करून पसार झाला होता आणि
पो.स्टे.लोहा येथे सरकारी पक्षा तर्फे पो.पाटील कारेगाव यांनी मयत अशोक सुरवसे या च्या खुनाचा गुन्हा दि १०/६/२०१७ ला गु.र.न.121/17 कलम ३०२ भा.द.वी अन्वये
अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला मग या अशोक चा मारेकरी कोण ह्याला का
आणि कशा साठी ठार मारले हे पोलिसांना शोधून ह्या खून प्रकरणाचा छडा लावायचा होता
या प्रकरणात सुरवातीचा तपास पो.नि.अशोक
चाटे यांच्या मार्गदर्शना खाली सुरु होता पण ते रजे वर गेले आणि स.पो.नि पाटील ह्यांनी लोहा पोलीस
ठाण्याचा प्रभार स्वीकारल्यानंतर ह्या खून प्रकरनाची चक्र गतीमान केली त्या आधी त्या
मयत अशोक च्या कुटुबियांना मयता बाबत माहिती देवून अशोक सुरवसे चा मृतदेह
त्यांच्या ताब्यात देवून पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ताब्यात दिला.
मयत अशोक वेजेनाथ सुरवसे वय
३० वर्ष रा.सोनीमोहा ता.धारूर जिल्हा बीड हा गरीब कुटुंबातील घरी गरिबी असतानाही
मोठ्या मेहनतीने त्याने त्याचे शिक्षण पूर्ण करून जिल्हा परिषद शाळेत नोकरीला
लागला त्या नंतर परिवाराचा गाडा रुळावर आला आणि लग्न करून सुखाचा संसार त्याचा
सुरु होता गावी आई वडील आणि पत्नी हे सर्व आपापल्या ठिकाणी सुखी होते पण कोनास
ठाऊक कि या चाकोरी बद्ध संसाराला कोणची नजर लागली माहीत नाही आणि सुखी संसाराची
वाताहत झाली कारण अशोक हा त्या घराचा एकमेव आधार होता तर अस काय झाला होत कि अशोक
चा काटा कोणी आणि कशासाठी काढला होता याच गुपित पोलिसांनी मोठ्या मेहनतीने शोधून या प्रकरणातील
आरोपीला गजाआड केला होता. स.पो.नि.पाटील यांनी लोहा पोलीस ठाण्याचा पदभार
स्वीकारल्या नंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने गती मिळाली तरी या प्रकरणाचा अधिक
तपास लोहा पोलीस ठाण्याचे पो.उप.नि.काथवटे,यांच्या कडे आहे त्या नुसार पोलीस आणि यांच्या सूत्रांनी कामाला
सुरवात केली जिल्हा परिषद शिक्षक असणारा अशोक हा येवढ्या दूर का आला होता त्याचा
मृत्यू असा का झाला होता पोलिसांनी वगवेगळ्या बाजूनी तपास सुरु केला त्यांनी अशोक
च्या पत्नीला तपासकामी पाचारण करण्यात आले पोलिसांना पहिल्यांदा हे प्रकरण अनेतिक
प्रेमसंबंधातून तर घडले नसावे अशी शक्यता वाटत होती पण त्या च्या पत्नी कडून अशी
माहिती किवा शक्यात पोलिसांना तपासात मिळून आली नाही मग अशोक चा कोणी दुश्मनी होती
का अशी माहिती हि पोलीसाना तपासकामी महत्वाची वाटत होत्ती पण तसे काही कळले नाही
पण त्याच्या पत्नी कडून माहिती घेत असताना पोलीसान असे समजले कि अशोक सुरवसे हा
रामपुरी ता.पाथरी जि.परभणी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा येथे कार्यरत होता आणि
त्याठिकाणीच वास्तव्य करत होता मागे काही महिन्या पूर्वी त्याच्यावर शाळेतील एका
अल्पवीन मुलीचा विनयभंग केला म्हणून त्याच्या विरुद्ध पाथरी येथे गुन्हा नोंद होता
आणि त्यामुळे त्याला तुरुंगाची हवा खावी लागली होती हि बाब पोलिसांना तपास कामात
समजली मग या प्रकरणाचा आणि मयत शिक्षक अशोक सुरवसे याच्या खुनाचा काही सम्बन्ध आहे
का हे तपासणे हि महत्वाचे होते पण तसा काही पुरावा पोलीस तपासात मिळून आला नाही पण
तुरुंगात असताना अशोक सुरवसे आणि एका बलात्कारच्या प्रकरणात अटक असणार्या आरोपी
सोबत अशोक ची मैत्री झाली होती अशी पुसट शी माहिती मयताच्या पत्नी ने पोलिसांना
दिली मग हा बलात्कार प्रकरणातील आरोपी कोण त्याचा आणि अशोक सुरवसे याचा काय सम्बंध
हे पोलीस शोधू लागले पोलिसांनी अशोक सुरवसे याचे कॉल रेकॉर्ड तपासले अशोक शी
संबंधित प्रत्येक व्यक्ती हि पोलिसांसाठी संशईत होती पण कॉल रेकॉर्ड आणि मयत अशोक
च्या पत्नी ने दिलेली माहिती पोलिसांसाठी महत्वाची ठरणार होती कारण या माहिती
वरूनच पोलिसांना या प्रकरणातील खरा गुन्हेगार सापडणार होता पोलीस आणि त्याचे खबरे
कामाला लागले पोलीस पथकांनी अशोक सुरवसे सोबत तुरुंगात कोण कोन होते आणि अशोक आणि
त्या लोकांचा पुन्हा सम्बंध आला होता का हे पोलीस शोधात होते आणि पोलिसांना असे
कळले कि अशोक सोबत असणार्या त्या बलात्कार प्रकरणातील आरोपी एकमेकांशी बोलणे होत
होते असे समजले त्या प्रमाणे पोलिसांना एक धागा मिळाला होता आणि या सुतावरूनच
पोलिसांनी स्वर्ग गाठला म्हणजे खर्या आरोपी च्या मुसक्या आवळ्ल्या लोहा पोलिसांनी
अशोक सुरवसे सोबत तुरुंगात असणारा आरोपी प्रसाद उर्फ प्रशांत बळीराम काळबांडे वय-२३
वर्ष रा.महमदापूर ता.पूर्णा जि.परभणी याला त्याच्या राहत्या घरून तपासकामी अटक
करून मा.न्यायालय समोर उभे केले आणि न्यायालयाने पोलिसांना संशईत आरोपी प्रशांत
उर्फ प्रसाद काळबांडे याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली मग काय पोलीस कोठडीत
पोलिसांनी प्रसाद उर्फ प्रशांत ला पोलिसी पाहूनचार दिला असता आरोपी हा बोलता झाला
आणि त्याने सर्व हकीकत पोलिसांना समोर कथन केली आरोपी आणि मयत हे दोघे तुरुगात
असतान दोघांची ओळख झाली आणि या दोघांची चांगलीच मैत्री झाली होती आणि प्रसाद आणि
अशोक हे तुरगात असताना आरोपी ने मयत अशोक चा चांगलाच विश्वास संपादन केला होता प्रसाद
ने मयत अशोक ला सांगीतले होते कि त्याचे बाहेर चागल्या लोकांसोबात सम्बंध आहेत आणि
तो अशोकला या विनयभंगाच्या केस मधून बाहेर काढतो असे पटवले होते आणि मयत हा प्रसाद
ह्या बोलण्यात अडकला काही दिवसाने मयत हा तुरुंगातून जामिनावर सुटला आणि त्या नंतर
आरोपी हि सुटला होता या नंतर हि आरोपी आणि मयत हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते
अधून मधून आरोपी आणि मयत यांच्यात फोना फोनी होत होती मयत हा या प्रकरणातून सही
सलामत सुटावे असे त्या ला वाटत कारण त्याच्या परिवाराचा एकमेव करता तोच होता पण
आरोपीने हीच कमजोरी हेरुन मयत अशोक याला प्रकरणातून सोडवण्यासाठी पेसे जमवण्यासाठी
सागितले होते त्या प्रमाणे मयत हा आरोपी च्या फोन वर संपर्कात होता हि बाब मयत
अशोक च्या पत्नी च्या नजरेत आली होती आणि तिने मयत याला या बाबत विचारणा केली होती
पण अशोक ने याबाबत जास्त काही तिला सांगितले नव्हते पण त्या च्या बोलण्यातून
प्रशांतउर्फ प्रसाद च नाव मात्र तिने ऐकल होत आणि हाच धागा पकडून पोलिसांनी
आरोपलीला गजाआड करता आल त्या प्रमाणे मयत हा पेश्याची जाडा जोड लावण्यात जुटला
होता आणि त्याने त्याच्या जवळील एका प्लॉट चा सोदा करून बयाना रक्कम घेतली होती हि
बाब आरोपीला माहित होती आणि हि रक्कम कशी मिळवता येईल यासाठी तो मनातल्या मनात कट
रचत होता आणि त्याचा तो कट त्याला पूर्णत्वास न्यायचा होता त्या प्रमाणे त्याने
अशोक ला फोन वर संपर्क करून त्या दोघांनी परभणी येथे भेटण्याचे ठरवले त्या प्रमाणे
मयत हा परभणी येथे आला होता आणि मग हे दोघे पालम मार्गे नांदेड ला येणायासाठी निघाले होते असे आरोपी ने
पोलिसांना सागितले आरोपी प्रशांत उर्फ प्रसाद काळबांडे आणि मयत अशोक सुरवसे हे
दोघे अशोक च्या दुचाकी क्र.mhmhMH 22 AE 1413 ने नांदेड कडे निघाले होते
कारेगाव लोह्या नजीक कारेगाव येथे आले असता रात्र झाली होती आणि हि रात्र हि अशोक ची शेवटची ठरणार
होती कारण आरोपीने निर्जन असे ठिकाण हेरून मयत अशोकला आपण थोडा आराम करून जेवण
करून आणि पुढे जाऊ असे समजून महामार्गा पासून २०० फुट आत एका शेतात थांमबले मग काय
त्या निर्जनस्थळी दोघे थांबले असता मयत बेसावध असताना स्वत जवळ असणार्या कोयत्याने
अशोक सुरवसे च्या डोक्यात धारधार शास्त्राचे वार करून जबर जखमी केले आणि त्या
ठिकाणाहून मयत अशोक ची मोटारसायकल घेऊन लोहा येथे आला होता त्याने मयत अशोक ची
मोटारसायकल शिवाजीचोक येथे सोडून पळ काढला आणि ती मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत
केली पण आरोपीने मोठ्या शिथापीने मयत अशोक चा काटा काडून त्याच्या जवळील अंदाजे
४०-५० हजार रुपये घेऊन पसार झाला होता अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.
तपासअधिकारी
पो.उप.नि.काथवटे
पो.कॉ.शरद सोनटक्के
आरोपी प्रसाद काळबांडे याने
तुरुंगात त्याच्या सोबत असणार्या अशोक सुरवसे ला विश्वासात घेऊन त्याच्या वर
असणार्या विनयभंगच्या गुन्ह्यातून त्याला सहीसलामत बाहेर काढतो आणि बाहेर माझी फार
मोठ्या मोठ्या लोकांनसोबत ओळख आहे म्हणून सांगितले होते आणि त्या साठी मोठी रक्कम
लागणार असे सांगितले म्हणुनच मयत अशोक हा त्याच्या कडे असणार्या एका प्लॉट चा सोदा
करून ५० हजार रुपये स्वत वरील आरोपातून मुक्ततता होईल या आशे वर प्रशांत उर्फ
प्रसाद काळबांडे याला कळवले आणि काय हि तुरुंगातील मैत्री आणि ती ५० हजार रुपयाची
रक्कम मयत अशोक च्या मरणाला कारणीभूत ठरली.
लोहा पोलिसांनी मोबाईल
सीडीआर आणि मयत अशोक च्या पत्नी ने दिलेल्या पुसटच्या माहिती वरून पोलिसांनी
मोठ्या शिताफिने आरोपी प्रसाद उर्फ प्रशांत काळबांडे याला गजाआड केला या प्रकरणाचा
तपास सुरवातीला पो.नि.अशोक चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला त्या नंतर स.पो.नि. विठ्ठल पाटील, तत्कालीन स.पो.नि.अमोल
धस,पो.उप.नि.रणजीत काथवटे,पोहेकॉ.मारोती सोनकांबळे, पोहेकॉ.गोन्टे, पो.कॉ.शरद
सोनटके आणि सहकार्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. या प्रकरणाचा अधिक तपास पो.उप.नि.रणजीत
काथवटे आणि सहकारी करत आहे
सचिन वाघमारे
सचिन वाघमारे
नांदेड