पूर्वीच्या क्षुल्लक भांडणाचा राग धरून मनात
सचिन ने पाठवले पवन ला यम सदनात....................
नांदेड: क्षुल्लक कारणावरून पूर्वीच्या भांडनाचा राग मनात धरून एका मित्राने दुसऱ्या
मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत
येनाऱ्या भागामध्ये घडली जो मित्र त्या मित्राच्या नेहमी संपर्कात होता त्याच
मित्राला आपल्या कडे बोलून गाफीलठेऊन ठार केले नांदेड शहरातील प्रसिद्ध अशा हेल्थ
जिम येथे कामकरणाऱ्या आरोपीने निर्दयपणे त्याला संपवल्याची घटना घडली
क्षुल्लक कारणावरून सचिन लोणे याने पवन हटकर
याचा खून केला नांदेड शहरातील भर वस्तीतील आणि वजिराबाद पोलीस ठाण्यापासून जवळ
असणाऱ्या एका हेल्थ क्लब मध्ये त्याचा खून हा ठरूवून केल्याचे पोलीस तपासात उघड
झाले नांदेड शहराला आता गुन्हेगारिचे माहेर घर म्हणनन वावग ठरुनये कारण नांदेड
शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे कारण पूर्वीच्या भाड्नाचा राग मनात धरून एक
मेकला ठार करण्याची जणू मालिकाच नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत
घडत आहे कारण मागील काही महिन्याचा विचार केला असता नांदेड शहरात मागील कुरापती
वरून एका तरुणाचा खून झाल्याची घटना इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती आणि
त्या घटने नंतर नांदेड शहरात मात्र खुनाची मालिका सुरु झाली इतवारा पोलिसांच्या
हद्दीत मयत माली यांची हत्या तीही दिवसाढवळ्या चित्रपटातील कथानकाला शोभेल अशा
प्रकारे भर वर्दळीच्या रस्त्यावर काही लोकांनी मोटारसायकली वर येत पिस्तुलातून
गोळ्या घालून ठार करून खुनाची मालिकाच जणू सुरु झाली त्या नंतर वजिराबाद पोलीस
ठाण्याच्या हद्दीत गुरुद्वारा परिसरात संध्याकाळी एका कार्यक्रमात जे कि एका पोलीस
कर्मचार्याच्या कार्यक्रमात त्याच पद्धतीने दहशत माजवत त्याच प्रकारे पिस्तुलाने गोळ्या घालत एकाला ठार केले आणि काही
लोकांना जखमी केले अशा तऱ्हेने खून मालिका नांदेड शहरात सुरु झाल्या आणि नांदेड
शहरात जणू भीतीची लाट पसरली होती आणि नांदेड शहराला आणि जग प्रसिद्ध गुरुद्वारा
परिसराला पोलीस छावणी चे रूप आले होते हे प्रकरण गरम असतानात पुनः नांदेडात तेही
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि ८/१/२०१७ रोजी तेही नांदेड शहरातील
गजबजलेल्या माणसांची नेहमी वर्दळ असणाऱ्या चिखलवाडी भागात असणाऱ्या प्रसिद्ध जिम
मध्ये एका तरुणाला गळा चिरून ठार केले होते आणि तेही त्याच्या मित्राने, या
प्रकरणाची सविस्तर हकीकत नांदेड वजिराबाद पोलीस सूत्रांनी दिल्या नुसार नांदेड
शहरातील मयत पवन देवानंद हटकर वय २४ वर्ष रा. देगावचाळ नांदेड मिस्त्री काम करत हा व आरोपी हे चांगले मित्र या दोघांचे चांगले
संबंध होते वा ते दोघे नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहत होते हा आरोपी सचिन आणि मयत
पवन हे दोघे चागले मित्र ज्यामुळे या दोघांचे एकमेकांच्या घरी हि येणे जाने होत
असत एकाचा भागत राहनारे होते मित्र मग तो कसलाका असेना मैत्री मध्ये गरीब श्रीमंत
असा भेदभाव कधीच नसतोच मैत्री हि नेहमी मित्रा मित्रात प्रेमाचा न दिसणारा धागा
निर्माण करत असते आपणा बराचश्या चित्रपटातून पहिले असेल कि मित्र हे एकमेकांसाठी
कुठल्याही थराला जायला तयार होतात आपन त्या चित्रपटातून पहिले असेल कि चित्रपटातील
नायका सोबत त्याच्या एक जिवलग मित्र हा नेहमी दाखवला जातो जो कि त्या नायकाच्या
सुख दुखात नेहमी त्याच्या सोबत सावली प्रमाणे दाखवला जातो कारण जे मित्र असतात ते
नेहमी मित्रान साठी प्रसंगी प्राणाची बाजी लावणासाठी मागे पुढे पाहत नाहीत कारण
मैत्री हि निस्वार्थ असते तरीही आजच्या जमण्यात मैत्री ची परीभाषा बदलली आहे कारण
आजकालच्या इन्स्टनट च्या जमान्यात त्याप्रमाणेच मित्रहि इस्टनट च बनवले जातात आणि
त्यांचा वापरची तसाच करून वापर झाल्यावर केराच्या टोपलीत भिरकावली जातात मग या
जमान्यात खरे मित्र असतात कि नाही असा प्रशन पडण स्वाभाविक आहे आजकाल आपल्या आजूबाजूला ज्या प्रमाणे घटना घडतात
म्हणून ह्या प्रश्नाना उत्तर मिळणे कठीणच त्याप्रमाणेच पवन आणि सचिन च्या बाबत होत
त्या दोघात मैत्री तर होती मात्र आजकालच्या व्यवहारिक जमान्यातील मैत्रीहि तशीच वा
त्या प्रमाणे होती का ते दोघे मित्र तर
होते पण त्यांनी मैत्री चा मतीअर्थ कधी समजून घेतला नाही कारण ते समजून घेण्याची
कुवत त्यांच्यात न्हवती का नाही तर सचिन कडून शुल्क कारणाचा राग मनात धरून त्याने
पवन ला ठार केलाच नसता दिनाक ०८/०१/२०१७ रोजीचा दिवस हा पवन च्या आयुष्तील शेवट चा
दिवस ठरला रविवार चा दिवस रविवार म्हणजे सुटीचा वार या दिवशी सरकारी आणि खाजगी कामाना विराम असतो
आणि या दिवसाची सर्व चाकरमाने आतुरतेनी वाट पाहत असतात त्या प्रमाणेच सर्वत्र वातावरण होत आणि जो तो
आपल्या परीने रविवार घालवण्याचे मनसुबे अखात असावेत पण सचिन मात्र पवन चा काटा कसा
काढता येईल याचाच डाव सचिनने आखला तर नासावा ना पण काही असो सचिन ज्या ठिकाणी
नांदेडात पार्ट टाईम कामकरत असलेल्या जिम मध्ये कायमचा संपवण्याची जागा तीच का
म्हणून ठरवली कारण रविवार हा सुट्टीचा
दिवस आणि ह्या दिवशी जिम वर कोणी नसते हे पवन ला ठाऊक होते म्हणून तो आणि त्याचा
आणखी एक मित्र त्या जिम मध्ये दारू पीत बसले होते आणि एक दोन पेग मारल्या नंतर
सचिन ने मयत पवन याला जिम वर बोलावून घेतले आणि हे सर्व जिम मधे दारू पीत बसले
होते दारू पिता पिता इकड च्या तिकडच्या गोष्ठी होऊ लागल्या होत्या पण सचिन च्या
मना मध्ये मात्र पूर्वीच्या भाड्नाचा राग हा तसाच होता आणि दारू च्या अमलात तो राग
खदखदत होता आता काय सचिन ने दारू पीत पीत पूर्वीच्या भांडणाचा विषय काढाला आणि
त्या दोघांत त्या कारणना वरून बाचा बाची सुरू झाली आणि हे सर्व तो मित्र पाहत होता
हे दोघे हि त्याचे मित्र आता कोणाला समजावू आणि कोणाला सांभाळू अशी परस्थिती हि
त्याची झाली होती त्या दोघाला समजावून
त्याने कसेबसे बसवले त्याला वाटले कि आता हे भांडण मिटल पण त्याला काय माहित कि
सचिन च्या मनात काय चाललय थोडावेळ सर्व शांत झाल होत आणि सर्व निवळल्या प्रमाणे
चालल होत आणि यांची बातचीत आणि पिन सुरू झाल आणि पवन ला लघुशंका आली आणि तो जिम
मधील बाथरूमकडे निघाला तोच त्याच्या मागोमाग सचिन हि निघाल दोघेहि दारूच्या नशेत
होते पण सचिन च्या मनातील घालमेल कमी होत नव्हती तो पवन च्या मागे निघाला आणि
त्याने बाथरूमकडे असणाऱ्या पवन ला गाठला आणि पुन्हा त्याच मागच्या भांडणाच्या
मुद्यावरून भांडूलागला हे भाडंन बाहरे बसलेल्या मित्राने हे एकले आणि तो त्या
ठिकाणी धावला व भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण आता हे भांडण न सुटणारे दिसले
म्हणून त्याने त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला आणि हिच नामी संधी वाटल्याने सचिन
ने त्याच्या जवळ असणाऱ्या चाकूने पवन च्या गळ्यावर वार केला आणि शरीरावर छाती आणि इतर
ठिकाणी जबर जखमा केल्या आणि ह्या जखमातून रक्त वाहत होते आणि काही वेळातच पवन
गतप्राण झाला त्याचा तो दुसरा मित्र हे भाडंन पाहून ह्या बाबीची माहिती देण्यासाठी पवन च्या घरी
गेला तो त्याच्या घरच्यांना घेऊन येई पर्यंत उशीर झाला होता पवन चा खात्मा केल्या
नंतर पवन चा मृतदेह जिम मध्येच सोडून सचिन पळाला होता आणि पवन चा मित्र हा पवन च्या घरच्या लोकांना घेऊन
पोहचला पण तो पर्यंत उशीर झाला होता पवन ने जगाचा निंरोप घेतला होता हि घटना पाहून
पवन च्या नातेवेकांनी आक्रोश केला पहाता पाहता लोकांचा जमाव जमुलागला आणि हि बाब
वजिराबाद पोलिसांना कळाली आणि वजिराबाद पोलीस हे फोज फाटा घेऊन पोहचले आणि
पोलिसांनी जी परिस्थिती पाहिली ती पाहून पोलीस हि क्षण भर हबकले पोलिसांनी
परिस्थिती हाताळत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि घटना स्थळाचा पंचनामा
सोपस्कार आटपून पवन हटकर चा मृतदेह हा उत्तरीयतपासणीसाठी शंकररावजी चव्हाण वेदेकीय
महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे पाठवला आणि त्या मागोमाग सरकारी दवाखान्यात
पवन चे नातेवेईक हि मोठ्ठया प्रमाणामत जमले होते पोलिसांना आता मात्र संयमान हि परिस्थिती
हाताळावी लागत होती जमाव हा प्रशुब्ब्ध होऊ नये म्हणुन बंदोबस्त हि मोठ्या
प्रमाणात मागून घेतला होता पवन च्या मृतदेहाचा उत्तरीय तपासणी नंतर नातेवाईकाना
सपुर्द करण्याची कार्यवाही करत होते पण पवन चे नातेवाईक मात्र पवन चा मृतदेह
ताब्यात घेण्यासाठी तयार होत नव्ह्वते आता मात्र वजिराबाद पोलीसान समोर मोठा पेच
प्रसंग निर्माण झाला होता कारण आरोपी सचिन लोणे ह्याला अटक केल्या शिवाय पवन चा
मृतदेह हा ताब्यात घेणार नाही असे ते म्हणत होते पोलीसान समोर हे मोठे आव्हान होते
कारण नांदेडत असणाऱ्या परिस्थितीमुळे हा पेच सोडवण्याचे आव्हान वजिराबाद पोलीसान
वर नव्हे तर नांदेड शहर पोलिसांना हि परिस्थितीत हाताळताना तारेवर कसरत कारावी
लागत होती पवन चे नातेवाईक हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते ज्याने पोलिसांन वर
तान वाढत होता नांदेड पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अति.पोलीस अधीक्षक संदीप
डोईफोडे,उप.वि.पोलीस.अधिकारी महेंद्र पंडित वजिराबाद पोलीस निरीक्षक सतीष गायकवाड,स.पो.नि.आनंद
झोटे या लोकांनी त्या वेळेसची परिस्थिती हाताळत आरोपी सचिन लोणे याला लवकरात लवकर
अटक करू असे आश्वासन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी दिल्या नंतर
नातेवाईकानी पवन चा मृतदेह ताब्यात घेऊन
अंत्यसंस्कार पार पडले तसेच वजिराबाद
पोलीस ठाण्यात आरोपी सचिन चन्द्रमुनी लोणे वय २२ वर्ष रा.देगाव चाळ नांदेड याच्या
विरोधात गुं.र.न ०८/२०१७ कलम ३०२ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करणायत आला त्यानंतर पो.अधीक्षक
संजय येनपुरे यांनी वजिराबाद पो.नि.गायकवाड, स.पो.नि.झोटे,स्था.गुन्हे.शाखा.पो.नि.अनिल
गायकवाड, स.पो.नि.दिघोरे इत्यादींना आरोपीच्या अटकेसाठी सुचना केल्या त्या नुसार
नांदेड वजिराबाद पोलीस ठाण्याचे स.पो.नि.आनंद झोटे यांच्या कडे या गुन्ह्याचा तपास
सोपवण्यात आला आणि पोलीस हे तपासकामी
लागले नांदेड पोलिसांनी सचिन लोणे संबंधीत सर्व लोकांची माहिती काढली होती तो
कोणाकाना कडे जाऊ शकतो कुठल्या नातेवाईकाडे लपून राहू शकतो त्या सर्व शक्यता
तपासण्यात आल्या त्या प्रमाणे पोलीस हे कामाला लागले होते आणि
त्यांनी त्यांच्या खबरी लोकांनाही सतर्क करत सचिन लोणे संबंधी कुठली माहिती मिळते
का ते तपासण्या साठी कामी लावले पोलीस हे फरार आरोपी सचिन लोणे चा कसून शोध घेत
होते पोलीस हे फरार आरोपी सचिन चा शोध घेत होते त्यानुसार स्था.गुन्हे.शा.नांदेड
पोलिसांना त्यांच्या खबऱ्या कडून दिनाक ११/०१/२०१७ रोजी पक्की खबर मिळाली कि
आरोपी हा नांदेडात येणार आहे त्या प्रमाणे वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलीस पथक आणि
स्था.गुन्हे.शाखा यांचे पथक हे आरोपी सचिन च्या मागावर होते चित्रपटातील कथानकाला
शोभेल असे पोलिसांनी आरोपीला पकडले होते ते म्हणजे आरोपी सचिन हा कासारखेडा येथून बसने
नांदेड ला येणार हि खबर पक्की होती त्या प्रमाणे पोलिसांचे पथक हे बसस्थानकावर
येणार म्हुणुन बस स्थानकावर सापळा रचला होता जसा आरोपी हा बसस्थानकावर पोहचला तसा
पोलीस त्याच्या मागावर होते वा त्यांनी त्याला ऑटोरिक्षातू उतरताना पोलिसांनी
नांदेड न्यायालय परिसरात सापळा रचला होता त्या प्रमाणे तो न्यायालय परिसरात उतरताच
पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला पकडला हि कार्यवाही हि नांदेड जिल्हा
पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे,उप विभागीय
पो.अधिकारी महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलीस ठाण्याचे
पो.नि.सतीष गायकवाड,स.पो.नि.आनंद झोटे, नांदेड स्था.गुन्हे.शाखा,स.पो.नि.विनोद
दिघोरे,बालाजी शिरगिरे,सदाशिव आव्हाड,दशरथ जांभळीकर यांच्या पथकाने हि कार्यवाही
करत आरोपी सचिन लोणे याला अटक केले आणि वजिराबाद पोलिसांनी आरोपी सचिन लोणे याला अटक
करून मा.नांदेड न्यायालया समोर उभे केले आणि पोलीस कोठडी ची मागणी केली तसी
मा.नायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.क्षुल्लक कारणावरून पूर्वीच्या भाड्नाचा
राग मनात धरून आरोपी ने त्याच्या मित्राला यमसदनी धाडले होते.
प्रतिनिधी
नांदेड.