Search This Blog

Wednesday, 15 November 2017

बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासली ; नराधम भावाने बहिणीसह प्रिकाराची हत्याच केली !!!


बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासली ;


नराधम भावाने बहिणीसह प्रिकाराची हत्याच केली !!!




नांदेड : बहनाने भाई की कलाई से प्यार बांधा हें
       प्यार के दो तार से संसार बांधा हें !!!!
बहीण भावाच्या नात्याला एक मूर्त रूप देणारा सन म्हणजे रक्षाबंधन हा सन फक्त भाव बहिणी च्या नात्यचा उत्सव ती बहिण त्या भावाला राखी बांधून त्याच्या कडून तिचे रक्षण करण्याचे वचन घेत असते पण या कलयुगातील भाऊ मात्र बहिणीच्या जीवावर उठल्याचे अनेक प्रसंग आपण एकले असतील नाही तर असा अमानुष प्रकार नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोकर म्हेसा रोडवर घडला  आणि हि घटना माणुसकीला काळिमा फासणारी होती. नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्याचा सीमावर्ती जिल्हा आणि तेलगणं राज्याचा सीमावर्ती भाग आणि या भागातील तेलगणं सीमावर्ती भागात येणाऱ्या भोकर म्हेसा रोड वर घडली आणि माणुसकीला काळिमा तर त्या भावाने दुहेरी खून करून तर लावालीच पण लोकांनी माणुसकी सोडून फक्त बघ्याची भूमिका वटवट जखमी तरुणीला वेळे वर उपचार मिळवून दिलीले असते तर तो जीव आज वाचला असता .

 विवाहित बहिणीचे गावातील एका दुसऱ्या जातीच्या तरुणावर लग्ना आधी पासून प्रेम होते आणि ते लग्ना नंतर हि चालू असल्याची कून कून लाग्नायाने एका भावाने त्याच्या बहिणीचा आणि तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केल्याची अमानुष घटना नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आणि कहर कि तो आरोपी स्वतः हून पोलीसांच्या स्वाधीन झाला पोलीसान समोर आरोपी उभा होता आणि त्याने जे सांगितले ते ऐकून पोलिसांना विश्वास बसत नव्हता त्याने सागितले कि साहेब मी माझ्या बहिणीचा आणि तिच्या प्रियकराचा खून केला आहे असे सांगताच पोलीस चक्रऊन गेले होते दुपारची वेळ होती आणि तो आरोपी स्वत च्या बहिणीचा खून केल्याची माहित सांगत होता हि बाब ऐकून पो.उ..नि.चव्हाण यांनी हि बाब त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना कळवली आणि घटनेची शहानिशा करण्यासाठी एक पोलीस टीम घेऊन त्या आरोपीने सांगितलेल्या स्थळ निवघा दिवशी मार्ग कडे रवाना झाले आणि पाहतात तर काय त्या ठिकाणी एका तरुणाचे आणि एका विवाहित तरुणीचे मृत देह त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसत होते आणि रसत्या पासून आत मध्ये गेल्यावर एक तरुण गळा चिरलेल्या अवस्थेत निर्जन शिवारात पडल्याचे दिसत होते तेलगणं आणि महाराष्ट्र सिमेलगत असणार्या निर्जन ठिकाणी आरोपीने नियोजनबद्ध रित्या सख्या बहिणीचा आणि तिच्या प्रियकराचा खून केला होता घटनेची शहानिशा होताच त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी अति.पोलीस अधीक्षक बारगळ साहेब उप.वि.पोलीस.अधिकारी.वाळवे भोकर चे पो.नि.शेळके,पो.उप.नि.सुनील चव्हाण,स.पो.उप.नि.कांबळे,पो.हे.कॉ.ठावरे,मुंढे,जाधव पो.कॉ.पाटील हे सर्व घटनास्थळी पोहचले होते त्या प्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा सोपस्कार आटपून दोन्ही प्रेतांना उत्तरीया तपासणीसाठी भोकर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आरोपी स्वतः हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता त्यामुळे पोलिसांना पुढील तपास करण्यासाठी अधिक श्रम करावे लागणार नव्हते तरी या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा.रं.न.२०४/१७ कलम ३०२ भा.द.वी अन्वये आरोपी दिगांबर बाबुराव दासरे (वय २५ वर्ष ) थेरबन ता.भोकर जि.नांदेड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी आरोपीला मा.न्यायालया समोर उभे करून पोलीस कोठडी मागून घेतली आणि आरोपीने पोलिसांना जी हकीकत सागितली ती ऐकून पोलीस स्तबद्ध झाले होते आरोपीने केवळ परिवाराची अब्रू जावून नये यासाठी विवाहित बहिनीच आणि तिच्या प्रियकराचा अमानुष खून केल्याचे आरोपीने पोलिसांना त्याच्या जबाबात सांगितले घटनेची सविस्तर हकीकत भोकर पोलीस सूत्रांनी दिल्या नुसार नांदेड जिल्ह्यातील तेलगणं आणि महाराष्ट्र सिमे लगत असणारा तालुका म्हणजे भोकर तालुका आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पूर्वीचा मतदारसंघ आणि आता त्याच्या सुविध पत्नी अमिता चव्हाण यांचा मतदारसंघ आणि यामुळे या भागाकडे सर्व जिल्ह्याच लक्ष या  नेहमीच असत आणि आता हि दुहेरी खुनाची घटना आणि हे दोन्ही खून करणारा दुसरा तिसरा कोन्ही नसून त्या मयत तरुणीचा सख्खा भाऊ हे खून करत असताना त्याच्यात कुठला राक्षस संचारला होता कि त्याने पुढे उद्भवणार्या परिणामाचा विचार केला नाही आणि त्या दोन निष्पाप प्रेमीयुगुलांना अमानुषपणे ठार केले.

आपल्या कडे म्हणजे भारत देशात जात धर्म पंथ लहान मोठा श्रीमंत गरीब असा भेद भाव केला जातो ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात हि जात धर्म पाहून कुणी कुणाला घर हि नाकारल्याचे उदाहरण आपण पाहतो पण या घटनेत मात्र एका जाती नसल्याने आणि बहिण विवाहा नंतर हि तिच्या प्रियकरा सोबत पळून जाऊन परिवाराची अब्रू वेशीवर टांगली या कारणा मुळे भावाने बहिणीला संपवले बहिण भावाचा पवित्र सन काही दिवसांन वर आला होता आणि त्या आधीच हि भयानक घटना घडली जी बहिण भावाला राखी चा पवित्र बंध बांधून त्याच्या कडून त्याच्या बहिणीच्या रक्षणाची शपथ घेत असतो कि तो भाऊ कुठल्याही परिस्थतीत त्याच्या बहिणीचे रक्षण करेन पण या घटनेत मात्र त्या नराधम भानेच बहिणीचा आणि तिच्या प्रियकराचा विळ्याने गळा चिरून निर्घृण खून केला होता .

त्याचे असे झाले मयत पूजा जेठ्ठीबा वर्शेवार(वय २२ वर्ष )रा.थेरबन हिचा विवाह भोकर येथील जेठ्ठीबा वर्शेवार यांच्या सोबत घटना घडण्याच्या महिनाभर पूर्वीचा झाला होता आणि आणि घटना घडली त्याच्या दोन दिवस आधी पूजा च्या पतीने भोकर पोलिसात विवाहिता पूजा हि हरवल्याची तकरार दिली होती आणि याची माहिती पूजा चा भाऊ दिगांबर बाबुराव दासरे याला कळाली आणि हि माहिती समजताच त्याच्या मस्तकात विजेचा धक्का लागावा त्याप्रमाणे त्याला झाले असावे कारण त्याने जे कृत्य केले त्या वरून तर असेच वाटते तो रागाच्या भरात होता आणि त्याला पक्की खात्री होती कि पूजा हि नक्कीच गोविंद विठ्ठल करहाले या च्या सोबत गेली असेल आणि असे वाटण्या मागे कारण हि होते.कारण पूजा आणि गोविंद हे एकाच गावचे रहिवाशी आणि दोघांची घरे हि शेजारी शेजारी आणि या शेजार तरुण मनाच्या भावना एक मेकांच्या नजरातून नेहमी भिडत होत्या आणि तरुण मन एक मेकांकडे आकर्षित होत होते त्या प्रमाणेच त्या दोघात हि होत आणि या प्रेमी युगलाचे प्रेम प्रकरण चे पूजाच्या लग्नाआधी पासून होते आणि हि कून कून पूजाच्या घरच्यालोकांना माहित होती MAHANAUAN म्हणुन त्यांनी पूजाचे लग्न भोकर येथे करून दिले आणि हे सर्व प्रकरण माहित असूनही दसरे परिवाराने पूजाचे लग्न करून दिले आणि या प्रेमवीरांची ताटा तुट केली पण तरी पूजाचे सासरी मन रमत नव्हते आणि ती नेहमी गोविंद च्या आठवणीत दिवस काढत होती पण काय करणार नाविलाज होता तिचा परिवाराची अब्रू विशीवर टांगली जाऊ नये महणून ती गप गुमान स्वतः हे दुख गिळून घेत होती पण तिच्या दु:खाचा  बांध एके दिवशी फुटला आणि तिने मन घट्ट करत सासरचा  उंबरा ओलंडला  हि बाब पूजाच्या सासरी समजताच त्या लोकांनी विवाहित पूजा हि हरवल्याची तकरार भोकर पोलीस ठाण्यात केली आणि हि गोष्ठ मयत पूजा चा भाऊ ह्यला समजली त्याने कोणालाही न सांगता तो पूजा  आणि तिचा प्रियकर हे दोघे कुठे आहेत हे त्याला ठाऊक होते तसाच तो त्या टिकाणी गेला आणि त्याने बहिण पुजा हि तिचा प्रियकर गोविंद कडेच गेली असण्याचे त्याला वाटले कारन लग्गना पूर्वी तिचे आणि गोविंद चे प्रेम सम्बंध होते या कारणावरूनच पूजा चे लग्गन भोकर येथे करून देण्यात आले होते आणि हि बाब पूजा चा भाऊ  चांगल्या प्रकारे जाणून होता आणि त्याचा संशय बरोबर हि निघाला मयत गोविंदचे नातेवाईक हे तेलगणं आणि     महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती मुधोळ या ठिकाणी गोविंद आणि पूजा असण्याचा संशय आरोपी दिगंबर ला होता म्हणून त्याने मोटारसायकल घेऊन मुधोळ ला जाण्याचे ठरवले तसा तो त्या ठिकाणी निघाला सकाळी लवकरच त्याने ते गाव गाठले आणि त्याचा संशय पक्का निघाला त्या ठिकाणी पूजा आणि गोविंद हे जोडपं त्याला तेथे मिळून आले दिगांबर दासरे ने त्या दोघानाही समजून सागण्याचा प्रयत्न केला पण ते दोघे हि काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते शेवटी नाइलाजाने त्यादोघांचे हि लग्न लाऊन देतो आणि घरच्या लोकांना समजून त्यांच्या प्रेमसंबंधाना मान्यता मिळून देतो असे म्हणून खोटे बोलून त्या दोघांना मोटारसायकलवर बसून निवघा-दिवशी रोडवर आणले रस्ता निर्जन आणि सामसूम पाहून त्याने त्या निर्जन शिवारात सकाळी १०-१०.३० वाजता च्या दरम्यान स्वतः जवळील विळ्याच्या साह्याने रोड पासून मधल्या भागात नेऊन गळाचिरून गोविंद आणि पुजला ठार मारण्यासाठी वार केले आणि त्या ठिकाणाहून पसार झाला घराची अब्रू बहिणीमुळे जाणार  समाजात आपल्या परिवाराची बेअब्रूहोणारा या धास्ती मुळे दिगांबर दासारे याने मागचा पुढचा विचार न करता बहिण व तिचा प्रियकर गोविंद कर्हाळे याचा खून करून पसार झाला त्या निर्जन रानात गोविंद चा खून करून आणि बहिणीला जबर जखमी करून पाळाला होता त्याला वाटले असेल कि बहीण हि गतप्राण झाली असेल पण त्याचा समज खोटा होता त्याने बहिणीला आणि गोविंद ला निवघा-दिवशी मार्गावर हि मोटारसायकल वर भोकर कडे येत असताना समजवण्याचा प्रयत्न केला होता कि पूजा हि विवाहित पण तरीही ती तिच्या लग्न संबंधाना डावलून लग्ना आधीच्या प्रियकरा सोबत पळून गेली होती आणि ती प्रियकरासोबत होती या घटनेने दासरे परिवार आणि पूजाचे नवीन सासर च्या मंडळीची बेअब्रू होणार या कारणावरून दिगम्बर दासरे याने त्याची सख्खी लहान बहिण पूजा आणि तिचा प्रियकर गोविंद करहाले या दोघांना ठार मारण्याच्या उदेशाने खोटे बोलून त्याच्या जवळील मोटारसायकलवर बसून भोकर कडे येत असताना रोड पासून आतल्या भागात घेऊन जाऊन बोलण्यात गुंतउन ठेऊन गोविंद याला विळ्याच्या साह्याने गळ्यावर वार करून ठार मारले आणि बहिण पूजा हिला हि त्याच प्रकारे जबर जखमी करून पळून गेला आणि त्याने भोकर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांच्या स्वाधीन झाला आणि सर्व हकीकत भोकर पोलिसांना सांगितली त्या प्रमाणे भोकर पोलीस पुढील तपास करीत आहेत.





                                               प्रतिनिधी नांदेड


Friday, 18 August 2017

तुरुंगातील मैत्री अशोक ला महागात पडली .....प्रसाद न अशोक ची गठडीच वळली !!!!

            
                               मयत : अशोक सुरवसे 


                तुरुंगातील मैत्री अशोक ला महागात पडली .....
                        प्रसाद न अशोक ची गठडीच वळली !!!!
नांदेड:
नांदेड-लातूर महामार्गावर येणाऱ्या कारेगाव शिवारात महामार्गा पासून २०० फुट अंतरावर एक 3०-३५  वर्षीय इसमाचे प्रेत असल्याची खबर कारेगाव चे पोलीस पाटील यांनी लोहा पोलिसांना कळवली पोलिसयेण्या आधी महामार्गावरून जाणारे येणारे बघ्यांची गर्दी जमली होती आणि hasssssssssहाsssssss म्हणता लोक त्याठिकाणी जमत होते  त्या सोबत  लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक त्या मध्ये पो.नि.अशोक चाटे,स.पो.नि.धस,स.पो.नि पाटील पो.उप.नि.काथवटे पो.हे.कॉ.मारोती सोनकांबळे,पोहेकॉ.गोनटे पो.कॉ.सोनटके,पो.कॉ.शरद आणि कर्मचारी हे कारेगाव शिवारात पोहाचले असता एक शेता मध्ये एक ३०-३५  वर्षीय इसम मृत अवस्तेत आढळून आला त्या प्रमाणे लोहा पोलिसांनी पंचनामा केला असता त्या इसमाच्या शरीरावर आणि डोक्यात जबर घाव आढळून आले त्या घावा मुळे तो इसम मृत झाला होता असे प्रथम दर्शनी वाटत होते  पोलिसांनी आजुबाजू जमलेल्या लोकांना तो इसम परिचित आहे का विचारले पण कोणीही माहिती देऊ शकले नाहीत त्या इसमाला कोणी तरी अज्ञात व्यक्ती ने ठार केले होते आणि मयत हि अनोळखी होता पण पोलिसांनी मयत माणसाची झडती घेतली असता पोलिसांना त्या च्या खिश्यात काही कागद पत्र मिळाल्यानुसार नुसार त्याची ओळख पटणार होती पण या माणसाला कोणी आणि कशा साठी ठार मारेल हि बाब अनुत्तरीत होती त्या मयत व्यक्तीचे नाव अशोक वैजनाथ सुरवसे रा. सोनीमोहा ता. धारूर जि. बीड असे होते पोलिसांनी असे आढळून आले कि त्या इसमाचा खून होउन २४ तासाहून अधिक काळ उलटले असावेत असे वाटत होते कारण हि घटना उघडकीस आली त्याच्या आदल्या दिवशी लोहा परिसरात पाऊस झाला होता त्यामुळे त्या इसमाचे प्रेत कुजू लागले होते त्याचे डोळे बाहेर पडले होते घटनास्थळी त्या इसमाचे रक्त पडले होते आणि शेजारी काही पडला होत का  घटनास्थळाची कसून आणि बारकाईने लोहा पोलीस पथकाने पहाणी केली आणि या गुन्ह्या संबंधी काही धागे दोरे मिळतात का ते तपासले पण घटनास्थालावरून अजून काही धागेदोरे मिळून आले नाही. पंचनामा सोपस्कार आटपून लोहा पोलिसांनी सदरील प्रेत उत्तरीया तपासणीसाठी पाठून दिले आणि हा मयत अशोक सुरवसे रा.सोनीमोहा ता.धारुर जि.बीड हा इतक्या लांब लोहा या ठिकाणी का आणि कशा साठी आला होता हे पोलिसांना शोधायचे होते.
जुन महिना म्हणजे पावसाळा सर्वत्र पावसाचे वातावरण आणि ढगांची गर्दी ह्या दिलखुलास आणि अल्हाद दाई वातावरण असते उन्हाळ्याची गर्मी पासून मृग नक्षत्रात बरसणाऱ्या सरी मुळे वातवरण आणि मन प्रसन्न होऊन जाते आणि त्या पावसाच्या सरींची आतुरतेने वाट पाहतो तो शेतकरी कारण ह्या पावसाच्या आगमनावर शेतकऱ्याच जीवन अवलंबून असते ह्या सर्व बाबी ह्या जीवन चक्रात आणि निसर्ग चक्रात घडणाऱ्या जस उन्हाळा येतो पावसाळा येतो                त्या नंतर हिवाळा आणि मग या ऋत्र चक्रात मानव जीवन हे चालत असते जस एखादा जीव जन्मतो तसाच तो निसर्ग नियमा प्रमाणे मारतो पण काही च्या नशिबी अकाली मरण येते त्या प्रमाणेच मयत अशोक च्या बाबतीत झाला होत तो बीड जिल्ह्याचा रहिवाशी आणि त्याचा मृतदेह हा नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील कारेगाव शिवारात आणि तो हि कोणी तरी त्याचा धारधार शस्त्राने वार  करून त्या चा खून करून पसार झाला होता आणि पो.स्टे.लोहा येथे सरकारी पक्षा तर्फे पो.पाटील कारेगाव यांनी  मयत अशोक सुरवसे या च्या खुनाचा गुन्हा  दि १०/६/२०१७ ला गु.र.न.121/17 कलम ३०२ भा.द.वी अन्वये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला मग या अशोक चा मारेकरी कोण ह्याला का आणि कशा साठी ठार मारले हे पोलिसांना शोधून ह्या खून प्रकरणाचा छडा लावायचा होता या  प्रकरणात सुरवातीचा तपास पो.नि.अशोक चाटे यांच्या मार्गदर्शना खाली सुरु होता पण ते रजे वर  गेले आणि स.पो.नि पाटील ह्यांनी लोहा पोलीस ठाण्याचा प्रभार स्वीकारल्यानंतर ह्या खून प्रकरनाची चक्र गतीमान केली त्या आधी त्या मयत अशोक च्या कुटुबियांना मयता बाबत माहिती देवून अशोक सुरवसे चा मृतदेह त्यांच्या ताब्यात देवून पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ताब्यात दिला.
मयत अशोक वेजेनाथ सुरवसे वय ३० वर्ष रा.सोनीमोहा ता.धारूर जिल्हा बीड हा गरीब कुटुंबातील घरी गरिबी असतानाही मोठ्या मेहनतीने त्याने त्याचे शिक्षण पूर्ण करून जिल्हा परिषद शाळेत नोकरीला लागला त्या नंतर परिवाराचा गाडा रुळावर आला आणि लग्न करून सुखाचा संसार त्याचा सुरु होता गावी आई वडील आणि पत्नी हे सर्व आपापल्या ठिकाणी सुखी होते पण कोनास ठाऊक कि या चाकोरी बद्ध संसाराला कोणची नजर लागली माहीत नाही आणि सुखी संसाराची वाताहत झाली कारण अशोक हा त्या घराचा एकमेव आधार होता तर अस काय झाला होत कि अशोक चा काटा कोणी आणि कशासाठी काढला होता याच गुपित  पोलिसांनी मोठ्या मेहनतीने शोधून या प्रकरणातील आरोपीला गजाआड केला होता. स.पो.नि.पाटील यांनी लोहा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्या नंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने गती मिळाली तरी या प्रकरणाचा अधिक तपास लोहा पोलीस ठाण्याचे पो.उप.नि.काथवटे,यांच्या कडे आहे  त्या नुसार पोलीस आणि यांच्या सूत्रांनी कामाला सुरवात केली जिल्हा परिषद शिक्षक असणारा अशोक हा येवढ्या दूर का आला होता त्याचा मृत्यू असा का झाला होता पोलिसांनी वगवेगळ्या बाजूनी तपास सुरु केला त्यांनी अशोक च्या पत्नीला तपासकामी पाचारण करण्यात आले पोलिसांना पहिल्यांदा हे प्रकरण अनेतिक प्रेमसंबंधातून तर घडले नसावे अशी शक्यता वाटत होती पण त्या च्या पत्नी कडून अशी माहिती किवा शक्यात पोलिसांना तपासात मिळून आली नाही मग अशोक चा कोणी दुश्मनी होती का अशी माहिती हि पोलीसाना तपासकामी महत्वाची वाटत होत्ती पण तसे काही कळले नाही पण त्याच्या पत्नी कडून माहिती घेत असताना पोलीसान असे समजले कि अशोक सुरवसे हा रामपुरी ता.पाथरी जि.परभणी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा येथे कार्यरत होता आणि त्याठिकाणीच वास्तव्य करत होता मागे काही महिन्या पूर्वी त्याच्यावर शाळेतील एका अल्पवीन मुलीचा विनयभंग केला म्हणून त्याच्या विरुद्ध पाथरी येथे गुन्हा नोंद होता आणि त्यामुळे त्याला तुरुंगाची हवा खावी लागली होती हि बाब पोलिसांना तपास कामात समजली मग या प्रकरणाचा आणि मयत शिक्षक अशोक सुरवसे याच्या खुनाचा काही सम्बन्ध आहे का हे तपासणे हि महत्वाचे होते पण तसा काही पुरावा पोलीस तपासात मिळून आला नाही पण तुरुंगात असताना अशोक सुरवसे आणि एका बलात्कारच्या प्रकरणात अटक असणार्या आरोपी सोबत अशोक ची मैत्री झाली होती अशी पुसट शी माहिती मयताच्या पत्नी ने पोलिसांना दिली मग हा बलात्कार प्रकरणातील आरोपी कोण त्याचा आणि अशोक सुरवसे याचा काय सम्बंध हे पोलीस शोधू लागले पोलिसांनी अशोक सुरवसे याचे कॉल रेकॉर्ड तपासले अशोक शी संबंधित प्रत्येक व्यक्ती हि पोलिसांसाठी संशईत होती पण कॉल रेकॉर्ड आणि मयत अशोक च्या पत्नी ने दिलेली माहिती पोलिसांसाठी महत्वाची ठरणार होती कारण या माहिती वरूनच पोलिसांना या प्रकरणातील खरा गुन्हेगार सापडणार होता पोलीस आणि त्याचे खबरे कामाला लागले पोलीस पथकांनी अशोक सुरवसे सोबत तुरुंगात कोण कोन होते आणि अशोक आणि त्या लोकांचा पुन्हा सम्बंध आला होता का हे पोलीस शोधात होते आणि पोलिसांना असे कळले कि अशोक सोबत असणार्या त्या बलात्कार प्रकरणातील आरोपी एकमेकांशी बोलणे होत होते असे समजले त्या प्रमाणे पोलिसांना एक धागा मिळाला होता आणि या सुतावरूनच पोलिसांनी स्वर्ग गाठला म्हणजे खर्या आरोपी च्या मुसक्या आवळ्ल्या लोहा पोलिसांनी अशोक सुरवसे सोबत तुरुंगात असणारा आरोपी प्रसाद उर्फ प्रशांत बळीराम काळबांडे वय-२३ वर्ष रा.महमदापूर ता.पूर्णा जि.परभणी याला त्याच्या राहत्या घरून तपासकामी अटक करून मा.न्यायालय समोर उभे केले आणि न्यायालयाने पोलिसांना संशईत आरोपी प्रशांत उर्फ प्रसाद काळबांडे याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली मग काय पोलीस कोठडीत पोलिसांनी प्रसाद उर्फ प्रशांत ला पोलिसी पाहूनचार दिला असता आरोपी हा बोलता झाला आणि त्याने सर्व हकीकत पोलिसांना समोर कथन केली आरोपी आणि मयत हे दोघे तुरुगात असतान दोघांची ओळख झाली आणि या दोघांची चांगलीच मैत्री झाली होती आणि प्रसाद आणि अशोक हे तुरगात असताना आरोपी ने मयत अशोक चा चांगलाच विश्वास संपादन केला होता प्रसाद ने मयत अशोक ला सांगीतले होते कि त्याचे बाहेर चागल्या लोकांसोबात सम्बंध आहेत आणि तो अशोकला या विनयभंगाच्या केस मधून बाहेर काढतो असे पटवले होते आणि मयत हा प्रसाद ह्या बोलण्यात अडकला काही दिवसाने मयत हा तुरुंगातून जामिनावर सुटला आणि त्या नंतर आरोपी हि सुटला होता या नंतर हि आरोपी आणि मयत हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते अधून मधून आरोपी आणि मयत यांच्यात फोना फोनी होत होती मयत हा या प्रकरणातून सही सलामत सुटावे असे त्या ला वाटत कारण त्याच्या परिवाराचा एकमेव करता तोच होता पण आरोपीने हीच कमजोरी हेरुन मयत अशोक याला प्रकरणातून सोडवण्यासाठी पेसे जमवण्यासाठी सागितले होते त्या प्रमाणे मयत हा आरोपी च्या फोन वर संपर्कात होता हि बाब मयत अशोक च्या पत्नी च्या नजरेत आली होती आणि तिने मयत याला या बाबत विचारणा केली होती पण अशोक ने याबाबत जास्त काही तिला सांगितले नव्हते पण त्या च्या बोलण्यातून प्रशांतउर्फ प्रसाद च नाव मात्र तिने ऐकल होत आणि हाच धागा पकडून पोलिसांनी आरोपलीला गजाआड करता आल त्या प्रमाणे मयत हा पेश्याची जाडा जोड लावण्यात जुटला होता आणि त्याने त्याच्या जवळील एका प्लॉट चा सोदा करून बयाना रक्कम घेतली होती हि बाब आरोपीला माहित होती आणि हि रक्कम कशी मिळवता येईल यासाठी तो मनातल्या मनात कट रचत होता आणि त्याचा तो कट त्याला पूर्णत्वास न्यायचा होता त्या प्रमाणे त्याने अशोक ला फोन वर संपर्क करून त्या दोघांनी परभणी येथे भेटण्याचे ठरवले त्या प्रमाणे मयत हा परभणी येथे आला होता आणि मग हे दोघे पालम मार्गे  नांदेड ला येणायासाठी निघाले होते असे आरोपी ने पोलिसांना सागितले आरोपी प्रशांत उर्फ प्रसाद काळबांडे आणि मयत अशोक सुरवसे हे दोघे अशोक च्या दुचाकी क्र.mhmhMH 22 AE 1413 ने नांदेड कडे निघाले होते कारेगाव लोह्या नजीक कारेगाव येथे आले असता रात्र  झाली होती आणि हि रात्र हि अशोक ची शेवटची ठरणार होती कारण आरोपीने निर्जन असे ठिकाण हेरून मयत अशोकला आपण थोडा आराम करून जेवण करून आणि पुढे जाऊ असे समजून महामार्गा पासून २०० फुट आत एका शेतात थांमबले मग काय त्या निर्जनस्थळी दोघे थांबले असता मयत बेसावध असताना स्वत जवळ असणार्या कोयत्याने अशोक सुरवसे च्या डोक्यात धारधार शास्त्राचे वार करून जबर जखमी केले आणि त्या ठिकाणाहून मयत अशोक ची मोटारसायकल घेऊन लोहा येथे आला होता त्याने मयत अशोक ची मोटारसायकल शिवाजीचोक येथे सोडून पळ काढला आणि ती मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली पण आरोपीने मोठ्या शिथापीने मयत अशोक चा काटा काडून त्याच्या जवळील अंदाजे ४०-५० हजार रुपये घेऊन पसार झाला होता अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.


तपासअधिकारी 
पो.उप.नि.काथवटे 

                              पो.कॉ.शरद सोनटक्के 
आरोपी प्रसाद काळबांडे याने तुरुंगात त्याच्या सोबत असणार्या अशोक सुरवसे ला विश्वासात घेऊन त्याच्या वर असणार्या विनयभंगच्या गुन्ह्यातून त्याला सहीसलामत बाहेर काढतो आणि बाहेर माझी फार मोठ्या मोठ्या लोकांनसोबत ओळख आहे म्हणून सांगितले होते आणि त्या साठी मोठी रक्कम लागणार असे सांगितले म्हणुनच मयत अशोक हा त्याच्या कडे असणार्या एका प्लॉट चा सोदा करून ५० हजार रुपये स्वत वरील आरोपातून मुक्ततता होईल या आशे वर प्रशांत उर्फ प्रसाद काळबांडे याला कळवले आणि काय हि तुरुंगातील मैत्री आणि ती ५० हजार रुपयाची रक्कम मयत अशोक च्या मरणाला कारणीभूत ठरली.
लोहा पोलिसांनी मोबाईल सीडीआर आणि मयत अशोक च्या पत्नी ने दिलेल्या पुसटच्या माहिती वरून पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपी प्रसाद उर्फ प्रशांत काळबांडे याला गजाआड केला या प्रकरणाचा तपास सुरवातीला पो.नि.अशोक चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला  त्या नंतर स.पो.नि. विठ्ठल पाटील, तत्कालीन स.पो.नि.अमोल धस,पो.उप.नि.रणजीत काथवटे,पोहेकॉ.मारोती सोनकांबळे, पोहेकॉ.गोन्टे, पो.कॉ.शरद सोनटके आणि सहकार्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. या प्रकरणाचा अधिक तपास पो.उप.नि.रणजीत काथवटे आणि सहकारी करत आहे






सचिन वाघमारे
नांदेड 

Wednesday, 8 March 2017

पूर्वीच्या क्षुल्लक भांडणाचा राग धरून मनात सचिन ने पाठवले पवन ला यम सदनात....................




पूर्वीच्या क्षुल्लक भांडणाचा राग धरून मनात
सचिन ने पाठवले पवन ला यम सदनात....................





नांदेड: क्षुल्लक कारणावरून पूर्वीच्या भांडनाचा राग मनात धरून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येनाऱ्या भागामध्ये घडली जो मित्र त्या मित्राच्या नेहमी संपर्कात होता त्याच मित्राला आपल्या कडे बोलून गाफीलठेऊन ठार केले नांदेड शहरातील प्रसिद्ध अशा हेल्थ जिम येथे कामकरणाऱ्या आरोपीने निर्दयपणे त्याला संपवल्याची घटना घडली   
क्षुल्लक कारणावरून सचिन लोणे याने पवन हटकर याचा खून केला नांदेड शहरातील भर वस्तीतील आणि वजिराबाद पोलीस ठाण्यापासून जवळ असणाऱ्या एका हेल्थ क्लब मध्ये त्याचा खून हा ठरूवून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले नांदेड शहराला आता गुन्हेगारिचे माहेर घर म्हणनन वावग ठरुनये कारण नांदेड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे कारण पूर्वीच्या भाड्नाचा राग मनात धरून एक मेकला ठार करण्याची जणू मालिकाच नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत आहे कारण मागील काही महिन्याचा विचार केला असता नांदेड शहरात मागील कुरापती वरून एका तरुणाचा खून झाल्याची घटना  इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती आणि त्या घटने नंतर नांदेड शहरात मात्र खुनाची मालिका सुरु झाली इतवारा पोलिसांच्या हद्दीत मयत माली यांची हत्या तीही दिवसाढवळ्या चित्रपटातील कथानकाला शोभेल अशा प्रकारे भर वर्दळीच्या   रस्त्यावर काही लोकांनी मोटारसायकली वर येत पिस्तुलातून गोळ्या घालून ठार करून खुनाची मालिकाच जणू सुरु झाली त्या नंतर वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुद्वारा परिसरात संध्याकाळी एका कार्यक्रमात जे कि एका पोलीस कर्मचार्याच्या कार्यक्रमात त्याच पद्धतीने दहशत माजवत त्याच प्रकारे  पिस्तुलाने गोळ्या घालत एकाला ठार केले आणि काही लोकांना जखमी केले अशा तऱ्हेने खून मालिका नांदेड शहरात सुरु झाल्या आणि नांदेड शहरात जणू भीतीची लाट पसरली होती आणि नांदेड शहराला आणि जग प्रसिद्ध गुरुद्वारा परिसराला पोलीस छावणी चे रूप आले होते हे प्रकरण गरम असतानात पुनः नांदेडात तेही वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि ८/१/२०१७ रोजी तेही नांदेड शहरातील गजबजलेल्या माणसांची नेहमी वर्दळ असणाऱ्या चिखलवाडी भागात असणाऱ्या प्रसिद्ध जिम मध्ये एका तरुणाला गळा चिरून ठार केले होते आणि तेही त्याच्या मित्राने, या प्रकरणाची सविस्तर हकीकत नांदेड वजिराबाद पोलीस सूत्रांनी दिल्या नुसार नांदेड शहरातील मयत पवन देवानंद हटकर वय २४ वर्ष  रा. देगावचाळ नांदेड मिस्त्री काम करत  हा व आरोपी हे चांगले मित्र या दोघांचे चांगले संबंध होते वा ते दोघे नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहत होते हा आरोपी सचिन आणि मयत पवन हे दोघे चागले मित्र ज्यामुळे या दोघांचे एकमेकांच्या घरी हि येणे जाने होत असत एकाचा भागत राहनारे होते मित्र मग तो कसलाका असेना मैत्री मध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव कधीच नसतोच मैत्री हि नेहमी मित्रा मित्रात प्रेमाचा न दिसणारा धागा निर्माण करत असते आपणा बराचश्या चित्रपटातून पहिले असेल कि मित्र हे एकमेकांसाठी कुठल्याही थराला जायला तयार होतात आपन त्या चित्रपटातून पहिले असेल कि चित्रपटातील नायका सोबत त्याच्या एक जिवलग मित्र हा नेहमी दाखवला जातो जो कि त्या नायकाच्या सुख दुखात नेहमी त्याच्या सोबत सावली प्रमाणे दाखवला जातो कारण जे मित्र असतात ते नेहमी मित्रान साठी प्रसंगी प्राणाची बाजी लावणासाठी मागे पुढे पाहत नाहीत कारण मैत्री हि निस्वार्थ असते तरीही आजच्या जमण्यात मैत्री ची परीभाषा बदलली आहे कारण आजकालच्या इन्स्टनट च्या जमान्यात त्याप्रमाणेच मित्रहि इस्टनट च बनवले जातात आणि त्यांचा वापरची तसाच करून वापर झाल्यावर केराच्या टोपलीत भिरकावली जातात मग या जमान्यात खरे मित्र असतात कि नाही असा प्रशन पडण स्वाभाविक आहे  आजकाल आपल्या आजूबाजूला ज्या प्रमाणे घटना घडतात म्हणून ह्या प्रश्नाना उत्तर मिळणे कठीणच त्याप्रमाणेच पवन आणि सचिन च्या बाबत होत त्या दोघात मैत्री तर होती मात्र आजकालच्या व्यवहारिक जमान्यातील मैत्रीहि तशीच वा त्या  प्रमाणे होती का ते दोघे मित्र तर होते पण त्यांनी मैत्री चा मतीअर्थ कधी समजून घेतला नाही कारण ते समजून घेण्याची कुवत त्यांच्यात न्हवती का नाही तर सचिन कडून शुल्क कारणाचा राग मनात धरून त्याने पवन ला ठार केलाच नसता दिनाक ०८/०१/२०१७ रोजीचा दिवस हा पवन च्या आयुष्तील शेवट चा दिवस ठरला रविवार चा दिवस रविवार म्हणजे सुटीचा वार  या दिवशी सरकारी आणि खाजगी कामाना विराम असतो आणि या दिवसाची सर्व चाकरमाने आतुरतेनी वाट पाहत असतात  त्या प्रमाणेच सर्वत्र वातावरण होत आणि जो तो आपल्या परीने रविवार घालवण्याचे मनसुबे अखात असावेत पण सचिन मात्र पवन चा काटा कसा काढता येईल याचाच डाव सचिनने आखला तर नासावा ना पण काही असो सचिन ज्या ठिकाणी नांदेडात पार्ट टाईम कामकरत असलेल्या जिम मध्ये कायमचा संपवण्याची जागा तीच का म्हणून ठरवली  कारण रविवार हा सुट्टीचा दिवस आणि ह्या दिवशी जिम वर कोणी नसते हे पवन ला ठाऊक होते म्हणून तो आणि त्याचा आणखी एक मित्र त्या जिम मध्ये दारू पीत बसले होते आणि एक दोन पेग मारल्या नंतर सचिन ने मयत पवन याला जिम वर बोलावून घेतले आणि हे सर्व जिम मधे दारू पीत बसले होते दारू पिता पिता इकड च्या तिकडच्या गोष्ठी होऊ लागल्या होत्या पण सचिन च्या मना मध्ये मात्र पूर्वीच्या भाड्नाचा राग हा तसाच होता आणि दारू च्या अमलात तो राग खदखदत होता आता काय सचिन ने दारू पीत पीत पूर्वीच्या भांडणाचा विषय काढाला आणि त्या दोघांत त्या कारणना वरून बाचा बाची सुरू झाली आणि हे सर्व तो मित्र पाहत होता हे दोघे हि त्याचे मित्र आता कोणाला समजावू आणि कोणाला सांभाळू अशी परस्थिती हि त्याची झाली होती त्या दोघाला  समजावून त्याने कसेबसे बसवले त्याला वाटले कि आता हे भांडण मिटल पण त्याला काय माहित कि सचिन च्या मनात काय चाललय थोडावेळ सर्व शांत झाल होत आणि सर्व निवळल्या प्रमाणे चालल होत आणि यांची बातचीत आणि पिन सुरू झाल आणि पवन ला लघुशंका आली आणि तो जिम मधील बाथरूमकडे निघाला तोच त्याच्या मागोमाग सचिन हि निघाल दोघेहि दारूच्या नशेत होते पण सचिन च्या मनातील घालमेल कमी होत नव्हती तो पवन च्या मागे निघाला आणि त्याने बाथरूमकडे असणाऱ्या पवन ला गाठला आणि पुन्हा त्याच मागच्या भांडणाच्या मुद्यावरून भांडूलागला हे भाडंन बाहरे बसलेल्या मित्राने हे एकले आणि तो त्या ठिकाणी धावला व भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण आता हे भांडण न सुटणारे दिसले म्हणून त्याने त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला आणि हिच नामी संधी वाटल्याने सचिन ने त्याच्या जवळ असणाऱ्या चाकूने पवन च्या गळ्यावर वार केला आणि शरीरावर छाती आणि इतर ठिकाणी जबर जखमा केल्या आणि ह्या जखमातून रक्त वाहत होते आणि काही वेळातच पवन गतप्राण झाला त्याचा तो दुसरा मित्र हे भाडंन पाहून  ह्या बाबीची माहिती देण्यासाठी पवन च्या घरी गेला तो त्याच्या घरच्यांना घेऊन येई पर्यंत उशीर झाला होता पवन चा खात्मा केल्या नंतर पवन चा मृतदेह जिम मध्येच सोडून सचिन पळाला होता आणि  पवन चा मित्र हा पवन च्या घरच्या लोकांना घेऊन पोहचला पण तो पर्यंत उशीर झाला होता पवन ने जगाचा निंरोप घेतला होता हि घटना पाहून पवन च्या नातेवेकांनी आक्रोश केला पहाता पाहता लोकांचा जमाव जमुलागला आणि हि बाब वजिराबाद पोलिसांना कळाली आणि वजिराबाद पोलीस हे फोज फाटा घेऊन पोहचले आणि पोलिसांनी जी परिस्थिती पाहिली ती पाहून पोलीस हि क्षण भर हबकले पोलिसांनी परिस्थिती हाताळत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि घटना स्थळाचा पंचनामा सोपस्कार आटपून पवन हटकर चा मृतदेह हा उत्तरीयतपासणीसाठी शंकररावजी चव्हाण वेदेकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे पाठवला आणि त्या मागोमाग सरकारी दवाखान्यात पवन चे नातेवेईक हि मोठ्ठया प्रमाणामत जमले होते पोलिसांना आता मात्र संयमान हि परिस्थिती हाताळावी लागत होती जमाव हा प्रशुब्ब्ध होऊ नये म्हणुन बंदोबस्त हि मोठ्या प्रमाणात मागून घेतला होता पवन च्या मृतदेहाचा उत्तरीय तपासणी नंतर नातेवाईकाना सपुर्द करण्याची कार्यवाही करत होते पण पवन चे नातेवाईक मात्र पवन चा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तयार होत नव्ह्वते आता मात्र वजिराबाद पोलीसान समोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता कारण आरोपी सचिन लोणे ह्याला अटक केल्या शिवाय पवन चा मृतदेह हा ताब्यात घेणार नाही असे ते म्हणत होते पोलीसान समोर हे मोठे आव्हान होते कारण नांदेडत असणाऱ्या परिस्थितीमुळे हा पेच सोडवण्याचे आव्हान वजिराबाद पोलीसान वर नव्हे तर नांदेड शहर पोलिसांना हि परिस्थितीत हाताळताना तारेवर कसरत कारावी लागत होती पवन चे नातेवाईक हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते ज्याने पोलिसांन वर तान वाढत होता नांदेड पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अति.पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे,उप.वि.पोलीस.अधिकारी महेंद्र पंडित वजिराबाद पोलीस निरीक्षक सतीष गायकवाड,स.पो.नि.आनंद झोटे या लोकांनी त्या वेळेसची परिस्थिती हाताळत आरोपी सचिन लोणे याला लवकरात लवकर अटक करू असे आश्वासन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी दिल्या नंतर नातेवाईकानी  पवन चा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार पार पडले  तसेच वजिराबाद पोलीस ठाण्यात आरोपी सचिन चन्द्रमुनी लोणे वय २२ वर्ष रा.देगाव चाळ नांदेड याच्या विरोधात गुं.र.न ०८/२०१७ कलम ३०२ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करणायत आला त्यानंतर पो.अधीक्षक संजय येनपुरे यांनी वजिराबाद पो.नि.गायकवाड, स.पो.नि.झोटे,स्था.गुन्हे.शाखा.पो.नि.अनिल गायकवाड, स.पो.नि.दिघोरे इत्यादींना आरोपीच्या अटकेसाठी सुचना केल्या त्या नुसार नांदेड वजिराबाद पोलीस ठाण्याचे स.पो.नि.आनंद झोटे यांच्या कडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला आणि  पोलीस हे तपासकामी लागले नांदेड पोलिसांनी सचिन लोणे संबंधीत सर्व लोकांची माहिती काढली होती तो कोणाकाना कडे जाऊ शकतो कुठल्या नातेवाईकाडे लपून राहू शकतो त्या सर्व शक्यता तपासण्यात  आल्या  त्या प्रमाणे पोलीस हे कामाला लागले होते आणि त्यांनी त्यांच्या खबरी लोकांनाही सतर्क करत सचिन लोणे संबंधी कुठली माहिती मिळते का ते तपासण्या साठी कामी लावले पोलीस हे फरार आरोपी सचिन लोणे चा कसून शोध घेत होते पोलीस हे फरार आरोपी सचिन चा शोध घेत होते त्यानुसार स्था.गुन्हे.शा.नांदेड पोलिसांना त्यांच्या खबऱ्या कडून दिनाक ११/०१/२०१७ रोजी पक्की खबर मिळाली कि आरोपी हा नांदेडात येणार आहे त्या प्रमाणे वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलीस पथक आणि स्था.गुन्हे.शाखा यांचे पथक हे आरोपी सचिन च्या मागावर होते चित्रपटातील कथानकाला शोभेल असे पोलिसांनी आरोपीला पकडले होते ते म्हणजे आरोपी सचिन हा कासारखेडा येथून बसने नांदेड ला येणार हि खबर पक्की होती त्या प्रमाणे पोलिसांचे पथक हे बसस्थानकावर येणार म्हुणुन बस स्थानकावर सापळा रचला होता जसा आरोपी हा बसस्थानकावर पोहचला तसा पोलीस त्याच्या मागावर होते वा त्यांनी त्याला ऑटोरिक्षातू उतरताना पोलिसांनी नांदेड न्यायालय परिसरात सापळा रचला होता त्या प्रमाणे तो न्यायालय परिसरात उतरताच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला पकडला हि कार्यवाही हि नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे,उप विभागीय पो.अधिकारी महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलीस ठाण्याचे पो.नि.सतीष गायकवाड,स.पो.नि.आनंद झोटे, नांदेड स्था.गुन्हे.शाखा,स.पो.नि.विनोद दिघोरे,बालाजी शिरगिरे,सदाशिव आव्हाड,दशरथ जांभळीकर यांच्या पथकाने हि कार्यवाही करत आरोपी सचिन लोणे याला अटक केले आणि वजिराबाद पोलिसांनी आरोपी सचिन लोणे याला अटक करून मा.नांदेड न्यायालया समोर उभे केले आणि पोलीस कोठडी ची मागणी केली तसी मा.नायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.क्षुल्लक कारणावरून पूर्वीच्या भाड्नाचा राग मनात धरून आरोपी ने त्याच्या मित्राला यमसदनी धाडले होते.
                                     
                                           प्रतिनिधी नांदेड.




 

Sunday, 15 January 2017

बाईच्या नादाने वाटोळे झाले ........

बाईच्या नादाने वाटोळे झाले ........
मयत सुनिता 

सुनिता 

DYSP महेंद्र पंडित 

SP संजय येनपुरे 

PI सुनील निकाळजे

PSI अर्चना बोरचते 

PHC जाकेर  

PC धुमाळ 
नांदेड : दिनाक 18/10/2016 रोजी भाग्यनगर पोलीस स्टेशन चे स.पो.नि मरे हे त्यांच्या सहकार्यान सोबत एका गुन्ह्याच्या तपासातील  आरोपी च्या शोधासाठी भाग्यनगर पोलीस स्टेशन च्या हद्द्दी मध्ये येणाऱ्या तरोडा( बु ) भागात शारदा construction कंपनी च्या मागे रोड च्या पलीकडे माधव कल्याणकर प्लॉटिंगकडे असणाऱ्या मोकळ्या  जागेत असलेल्या पाईप मधे आरोपी चा शोध घेत असताना त्या पाईप मधदे एक महिला पालथी पडलेली दिसली ती स्त्री अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष वयाची वाटत होती त्या स्त्री जवळ जाऊन कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पण त्या स्त्री ची काही एक हालचाल दिसली नाही तिला हाक मारून उठवण्याचा प्रयत्न केला पण कसलाच प्रतिसाद दिसला नाही आता मात्र पोलिसांना ती बाई मृत असावी याची खात्री वाटली
स.पो.नि.मरे यांनी या गंभीर घटनेची खबर वरिष्ट अधिकार्याना भ्रमणध्वनीद्वारे कळवली त्या प्रमाणे भाग्यनगर पोलिस स्टेशन चे पो.नि.निकाळजे व उप.विभा पोलीस अधिकारी नांदेड शहर महेंद्र पंडित उप.विभा.पोलीस अधिकारी महेंद्र पंडित त्यांचे सहकारी पो.उप.नि.अमृता बोरचाटे पो.उप.नि.कंधारे पो.हे.कॉ. जाकेर पो.कॉ.पवार पो.कॉ. धुमाळ, कदम,पांचाल हे घटनास्थळी पोहचले उप.वि.पोलीस अधिकारी महेंद्र पंडित पो. नि. सुनील निकाळजे यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहनि करून पोलीस पथकाला तपासणीसाठी सूचना केल्या , नांदेड भाग्यनगर पोलीस स्टेशन च्या हद्द्दी चा विचार केला असता नांदेड शहरातील झपाट्याने वाढणारी मानवी वस्ती बरोबर वाईट प्रवृत्ती हि झपाट्याने वाढत आहेत म्हणूनच या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वच प्रच्या गुन्ह्या मधे मोठ्या वाढ दिसते ते त्या मधे मालमत्ते संबंदि गुन्हे घरफोड्या खून या प्रकारच्या गुन्ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या चे दिसतात वाढत्या शहरीकरणामुळे या भाग मध्ये flat संस्कृती वाढत असल्याचे दिसते संस्कृती मुळे जसे मानव हा समाजप्रिय प्राणी आहे पण flat संस्कृती मुळे कोणी कोणाचा संपर्कात नसतो जोतो बंद दाराआड  च्या जगात रममाण या वाढत्या flat संस्कृतीमुळे वाढत्या शहरीकारणामुळे व वाढत्या flat च्या बांधकामच्या मुळे या भाग मध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य पडले असते आशा एका ठिकाणी त्या तरुण स्त्री चा मृतदेह पोलीसाना मिळाला त्या ठिकाणी पोलीसाना बारकाईने पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांना त्या तरुणी ची ओळख पटावी अशी एक हि वस्तू मिळून आली नाही ज्याने त्या मयत स्त्री ची ओळख पटेल पोलिसांना त्याच्या  मयत स्त्री च्या प्रयत्न करावे लागणार होते म्हणुन पोलीसानि त्या मयत स्त्री च्या संबंधी ओळख पत्रिका बनून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यान पाठवण्यात आल्या त्या प्रमाणे पोलीस पथकाला पो नि निकाळजे यांनी मयत बाई च्या माहिती मिळवण्यासाठी कामाला लावले होते मयत हि कुठली तिला कोणी व का मारले हे प्रश्न पोलीसान समोर होते. भाग्यानगर पोलीसान त्या स्त्रीची ओळख पटविण्यासाठी जास्त आटापिटा करावा लागला नाही कारण त्या मयत स्त्री च्या संबंधी वर्तमानपत्रा मधून बातम्या प्रकाशित झाल्या होत्या त्यामुळे त्या मयत बाई च्या नातेवाइकांना माहिती काळाली म्हणून नातेवाईक भाग्यनगर पोलिस ठाण्यात पोहचले वा त्यांनी पोलिसांना त्या मयत स्त्री च्या सम्बन्धी माहिती दिली म्हणजे ती स्त्री होती सुनिता चिन्नु सुलेवार आता पोलिसांना त्या मयत स्त्री ची ओळख पटली होती त्या प्रमाणे पोलिसांना आता मग त्या  मयत स्त्री ला कोणी वा कशसाठी मारले हे मात्र पोलिसांना शोधायचे होते त्याप्रमाणे पोलिस कामाला लागलेमयत स्त्री ची ओळख पटून तिचे प्रेत तिचे वडील चिन्नु विठ्ठल सुलेवाड यांना पुढील विधी साठी त्यांच्या ताब्यात दिले पोलीस पथकाला या सुनिता चा मारेकरी कोण हे पोलिसांना शोधणे महत्वाचे होते पण भाग्यनगर पोलिसांना या प्रकरणा मध्ये म्हणावे तसे यश येत नव्ह्ते म्हणुन नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक संजय येनपुरे व  उप वि पो अधिकारी महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शना खाली स्था गुन्हे शाखा नांदेड यांना हि या प्रकरणातील आरोपी च्या शोधासाठी पो नि गायकवाड यांना सूचना देण्यात आल्या त्या प्रमाणे पो नि गायकवाड यांनी त्यांच्या पथकाला मयत सुनिता च्या मारेकर्याला शोधन्यासाठी सूचना केल्या त्या प्रमाणे स्था गुन्हे शाखा नांदेड च्या पथकाने आरोपी च्या शोधासाठी प्रयत्न सुरु केले त्या प्रमाणे गुन्हे शाख तपास पथकाने शोध घेऊन या प्रकरणातील आरोपीला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती घेऊन त्याचा शोध घेतला व मयत सुनिता बाबत परिपूर्ण माहिती घेऊन ती काय काम करत होती ती कोणच्या संपर्कात होती या बाबत ची माहिती पोलिस काढत होते त्या प्रमाणेपोलिसांनी सर्व माहिती गोळा करून व ती वापरत असलेल्या मोबाईल क्रमाकाचा cdr मागून पोलिसांना  एक मोबाईल नंबर मिळून आला महणून त्या इसमाला गुन्हे शोध पथकाने त्याला या बद्दल काही एक माहिती आहे का नाही हे त्याला बोलावल्यावर कळlले असते यासाठी पोलिस त्याचा घेत होते पोलिसांना एक धागा मिळला होता त्या धाग्याहून पोलिसांना स्वर्ग गाठायचा होता पोलिसांनी सषईत आरोपी दिपक वाघमारे वय 30 वर्ष व्यवसाय मजुरी रा. विजयनगर,शिव रोड नांदेड सुनिता सुलेवाड हि च्या खुनाच्या संबंधाने विचारपूस करण्यासाटी बोलावले असता पण दिपक वाघमारे याने या खुनाशी आपला काही एक संबंध नाही अशी बतावनी करत होता मात्र तपासअधिकारी पो.नि.निकाळजे यांच्या प्रश्नाच्या भडीमार समोर त्याच काही एक चालल नाही व आरोपी दिपक वाघमारे याने त्याचा गुन्हा कबूल केला आणि त्याने सुनिता चा खून का व कशा साठी केला ते पोलीसान समोर कथन केले त्याने जी हकीकत पोलीसाना सांगितली ती एकूण पोलिस हि थक्क राहिले दिपक वाघमारे आणि सुनिता ह्या दोघांचा एक च मित्र ज्याने ४-५ वर्षा पूर्वी पहिल्यांदा ह्या दोघांची ओळख करुन दिली होती सुनिता हि महिला बचत गटाचे  करत होती आणि दिपक हा त्याचे खासगी फायनास चालवायचा आणि ह्या दोघांचा एक कॉमन मित्र होता ज्याने ह्या दोघांची ओळख  करून दिली होती त्या नंतर दिपक आणि सुनिता या दोघांच्या सारख्या भेटी होत आसत त्याची मित्री वाढत जात होती आणि या मैत्रीच रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांना हि कळले नाही मग काय या दोघांच प्रेम वरच्या वर बहरत होत  त्यांची मन एक रूप होत होती सारख्या भेटी व्ह्याच्या त्याचं हे प्रकरण ४-५ वर्षा पासून सुरु होते ती आई वडिलापासून वेगळी एकटी राहत होती या मुळेच दिपक आणि सुनिता ला मोकळीक मिळत होती दिपक च अस म्हणन होतकी दिपक हाच सुनिता चे घर चालवायचा पण काही का असेना दिपक आणि सुनिता एक मेकात पूर्ण एक रूप झाले होते आणि दिपक सुनितावर हक्क गाजवत होता सुनिता हि महिला बचत गटाचे काम करत असल्यामुळे ती सतत महिला वर्गाच्या संपर्कात असत पण हि बाब दिपक ला पटत नव्हती यातून त्या दोघात कधी वाद होत असत हे त्या दोघात चालू होत पण दिपक ला सुनिता चे हे वागणे पसंत पडत नव्हते त्याने बरेच वेळेस एका महिले सोबत फिरताना पहिले होते दिपक ला ती महिला वेगळ्या वळणाची आहे आसे वाटत त्याच्या मनात वेगळाच स संशय येऊ लागला होता त्याला वाटत होते कि सुनिता पण त्या बाई च्या नादाने त्या वळनाला तर गेली नाही ना या बाबी चा संशय दिपक च्या मनात घर करून बसले होते या करणा वरून त्याने सुनिताचा घात केला होता दिनाक १७/१०/२०१६ रोजी सुनिताला दिपक ने रात्री ८.३० ते ९.०० दरम्यान भाग्यनगर पोलीस स्टेशन च्या हद्द्दी मध्ये येणाऱ्या तरोडा (बु) भागात शारदा construction कंपनी च्या मागे रोड च्या पलीकडे माधव कल्याणकर प्लॉटिंगकडे असणाऱ्या मोकळ्या जागेत त्याच्या बुलट मोटारसायाकल वर बसून नेले आणि पुन्हा त्यांच्यात त्या बाई सोबत फिरण्याहून वा त्या वळणाला का जातेस म्हणुन वाद काढला यात त्या दोघान मध्ये भांडण सुरु झाल होत दिपक मात्र पूर्ण तयारी निशी त्या ठिकाणी आला होता दिपक ने सोबत घरात भाजी चिरण्यासाठी वापरतात तो चाकू आणि पंच सोबत आणला होता त्या दोघात वाद वाढत होता तसा दिपक चा राग अनावर होत होता त्याने त्याच्या जवळील पंचने सुनिताच्या पोटात जोरदार मुक्का मारला त्या मुक्कया सोबत सुनिता किंकाळी पण त्या निर्मनुष ठिकाणी तिचा आवाज ऐकनारे कोणी नव्हते याचाच दिपकने फायदा घेतला आणि सुनिता पंचच्या मारणे विव्हळत होती पण त्याच्या मनातील राग तो सुनितावर अमानुष वार करून काढत होता त्याने कोण जाने तो असे का करत होता त्याला आसा काय राग होता जो तो सुनितावर अमानुषपने वर करून काढत होतो ता एवढ्यावर थाबला नव्हता त्याने सुनिताच्या गळ्यात असणार्या ओढणीने तिचा गळा आवळला आणि तिचा खून केला ती मरण पावली का नाही याची खात्री करून त्याने सुनिता चे प्रेत त्याने त्या मोकळ्या जागेत असनार्या मोठ मोठ्या रिकाम्या पाईप मध्ये नेऊन टाकला आणि त्या ठिकाणाहून मोटारसायकल वरून पळ काढला दुसर्या दिवशी जेव्हा स.पो.नि.शरद सुभाष मरे वा त्यांचे  साथीदार पो.कॉ .कांबळे, पो.कॉ.शेख,पो.ना .ढोले हे सर्व त्या भागमध्ये एका आरोपी चा शोध घेत असताना त्यांना सुनिता चा मृतदेह मिळून आला या खून प्रकरणाचा गुन्हा भाग्यनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी च्या विरोधात गु.र.न २४५/१६ कलम ३०२ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोदवण्यात आला आणि या गुंता गुंती च्या प्रकारनाची जबाबदारी तपासाधिकारी म्हणुन स्वतः पो.नि.निकाळजे यांनी घेतली आणि यामुळे हे प्रकरण समोर आले आणि भाग्यनगर पोलिसांनी या गुंता गुंती च्या प्रकरणाला सोडवले व आरोपी चा माग काढत सुनिता व दिपक च्या संबनधा ची माहिती काढत आणि सुनिता दिपक च्या मोबाईल कॉल डिटेल वरून सुनिता फोन वर केलेल्या शेवट च्या कॉल वरून दिपक चा माग काढून त्याला दिनांक २२-१०-२०१६ रोजी रात्री १२.५० वाजता अटक करण्यात आली दिपक निवृत्ती वाघमारे रा.विजय नगर नांदेड याला मा.नांदेड न्यायालया समोर हजर करून पी सी र मागून घेऊन आरोपी कडून हा गुन्हा का व कोण्या कारणामुळे केला हे आरोपी कडून कबुल करून घेऊन आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेली बुलेट क्र.म.MH 26 A Q 41हि व आरोपी ने गुन्हया च्या दिवशी वापरलेले कपडे मोबाईल हे सर्व तपासकामी ताब्यात घेण्यात आले
नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक संजय एनपुरे व उप.वि.पोलीसअधिकारी नांदेड शहर महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तपासअधिकारी एस.बी.निकाळजे,स.पो.नि.मरे पो.उप.नि.अमृता  बोरचाटे,पो.उप.नि.कंधारे,पो.हे.कॉ.जाकेर,पो.कॉ.पवार,पो.कॉ.कदम,पो.कॉ.धुमाळ.यानी तपास केला.या प्रकरणाचा अधिक तपास भाग्यनगर पोलिस ठाण्या चे पो.नि.सुनील निकाळजे हे करत आहेत.  


प्रतिनिधी नांदेड